HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे आमनेसामने येणार?

मुंबई। राज्यात उद्यापासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन ( Winter Session) सुरू होणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नागपूरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन हे पहिले आहे. या अधिवेशनात विरोधक सत्ताधा-यांना महापुरुषांचा होणारा अवमान, राज्यातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाणे, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि अन्य मुद्यांवर कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. नागपूरमध्ये उद्या (१९ डिसेंबर) होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) येण्याची माहिती त्यांनी खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.
राज्यात सत्तांतरनंतर पहिल्या  उद्धव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे दोघेही समोरा-समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापुर्वी महाविकास आघाडीच्या काळात नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडले होते. यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हिवाळी अधिवेशन मुंबईत पार पाडली होती. आता राज्यात शिंदे सरकारच्या काळात हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार आहे.
दरम्यान, अधिवेशाच्या अनुषंगाने आज दुपारी विरोधकांची बैठक पार पडली असून या बैठकीनंतर विरोधक पत्रकार परिषदे घेणार आहे. यानंतर राज्य सरकार कॅबिनेट बैठक होणार असून या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. यानंतर विरोधक आणि सत्तधा-यांचा चहा-पानाचा कार्यक्रम होणार आहे.

Related posts

पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूकीत राष्ट्रवादीचे अरूण लाड यांचा विजय!

News Desk

गोविंद पानसरे हत्या प्रकरण : संथ गतीच्या तपासावरून उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडे बोल

News Desk

RBIने वसंतदादा सहकारी बॅंकेचं लायसन्स केलं रद्द

News Desk