HW News Marathi
Covid-19

‘कोरोना‘च्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कृती दल; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती

मुंबई | चीनसह अन्य काही देशांत कोरोना विषाणूचे (Covid 19) रुग्ण पुन्हा आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कृती दल गठित करून केंद्र सरकारबरोबर समन्वय ठेवत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी (22 डिसेंबर) विधानसभेत सांगितले.

विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉइंट ऑफ इन्फर्मेशनचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावेळी उपमुख्यमंत्री  फडणवीस बोलत होते. त्यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या परिस्थितीवर राज्य शासन लक्ष ठेवून आहे. कृती दल गठित करून आणि केंद्र सरकारबरोबर समन्वय ठेवत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येईल.

“कोव्हिडचा पहिला डोस, दुसरा डोस आणि 60-65 वर्षांवरील लोकांना बुस्टर डोस दिलेला आहे. यामुळे घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही. इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुविधा, आरोग्य सुविधा आणि कोव्हिडबाबत तयारीमध्ये आहेत. याचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती “, असे राज्याचे आरोपग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.

 

 

Related posts

लहान मुलांसाठी मॉडर्ना कंपनी लवकरच 50 मायक्रोग्राम मात्रेच्या लसींची करणार निर्मिती

News Desk

आज २९३३ नवीन रुग्णांची नोंद, राज्यात ४१ हजार ३९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

News Desk

स्पुटनिक लस भारतात पोहचली, पुढील आठवड्यापासून बाजारात उपलब्ध होणार

News Desk