HW News Marathi
महाराष्ट्र

“तर ‘प्रहार’मधून घणाघात करेन!” नारायण राणेंचा सरकारला इशारा

सिंधुदर्ग। केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनाशीर्वाद यात्रेचा आज(29 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे. वैयक्तिक टीका करणं थांबवा अन्यथा प्रहामधून लिहायला सुरुवात करेन. मी गप्प बसणार नाही, असा निर्वाणीचा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

आता हे सर्व बस्स करा

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. मी शेवटी एवढेच म्हणेल की आता हे सर्व बस्स करा. जर संजय राऊत यांनी हे थांबवले नाही तर मी पण प्रहारमधून सुरु करेल. कोण कुठे बसतो, काय करतो याचा गौप्यस्फोट करेल, असा इशारा राणे यांनी दिला. अनिल परब कितीही लपून काहीही करत असले तरी त्यांचे कारनामे कॅमेऱ्यावर आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

एक मांजर आडवी आली. मात्र मी त्याकडे लक्ष देत नाही

या दौऱ्यामध्ये अपशकुन आले. एक मांजर आडवी आली. मात्र मी त्याकडे लक्ष देत नाही. त्यांनी सामनातून अग्रलेख लिहिले. आमच्या मुलावर बोलले. माझी दोन्ही मुलं चांगली आहेत. मात्र तुमच्या मुलांचे पराक्रम आधी बघा. मग आमच्यावर बोला, असा दमच राणेंनी भरला. तोंडावर भेटल्यावर चांगले बोलायचं. लेखणी हातात आली आणि वरुन फोन आला तर ये रे माझ्या मागल्या करायचं हे धंदे सोडा, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.

शिवसैनिकांनी रथयात्रा थांबवण्याचा प्लान होता

शिवसैनिकांनी रथयात्रा थांबवण्याचा प्लान होता. पण 12 ते 15 लोकच समोर दिसले. माझी गाडी आली तेव्हा शिवसैनिकांनी कलटी मारली. राणेंवर बोलल्याने पद मिळतात म्हणून सर्व सुरू झालं आहे. अशा लोकांनी गप्प रहावे. मला माझे काम करु द्या. काही लोक मला खिश्यात ओढायला पाहतात, माझ्या हातून काही चूक होईल पण असं होणार नाही. मी गप्पही बसणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

साहेब अज्ञातस्थळी असताना मी त्यांच्याबरोबर होतो

बाळासाहेबांना धोका होता तेव्हा साहेबांनी मला माझ्या लोकांना घेवून बोलावले होते. साहेब अज्ञातस्थळी असताना मी त्यांच्याबरोबर होतो. त्यांनी मुलाला सोबत घेतलं नव्हतं, असंही ते म्हणाले आहेत. महाराष्ट्राचे कुठलेही काम असेल तर मी ते करेल. उद्या एखादा शिवसैनिक जरी माझ्याकडे एखादी स्किम घेऊन आला तरी मी काम करेन. कारण शेवटी तो देशाचा नागरिक आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

Aprna

महिलांच्या आनंदावर विरजण, रेल्वे बोर्डाने सांगितले सध्या महिलांना रेल्वेने प्रवास करता येणार नाही

News Desk

गँगस्टार शरद मोहोळच्या पत्नीने केला चंद्रकांत पाटलांचा सत्कार, प्रवेश मात्र टाळला!

News Desk