मुंबई | “तुमच्यासारखा पळून नाही गेलो, इडीने बोलविल्यावर मी शरणागती पत्करलेली नाही. बरे का…नामर्द नाही आहोत”, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर केली आहे. संजय राऊत हे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत आज (6 जानेवारी) माध्यमांशी बोलताना नारायण राणे हल्लाबोल केला आहे.
सामनात 26 डिसेंबचा अग्रलेख मी वाचला आहे, हे माझ्या लक्ष्यात आहे, संजय राऊत यांच्या तुरुंगात जाण्याचा मार्ग मी मोकळा करणार आहे, असे नारायण राणे म्हटले, यावर पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारल्यावर त म्हणाले, “100 टक्के त्यांनी केले पाहिजे, त्यांच्यासारखे आम्ही डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही. एक लक्ष्यात घ्या, कोण कोणाच्या हिंमतीच्या गोष्टी, धाडसाच्या गोष्टी त्यांनी बोलाव्यात. मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोलल्यालो नाही. एकेकाळी ते आमचे सहकारी होते, धमक्या देऊ नका. धमक्या देणार असाल ना, तर राज्यवस्त्र बाजूला काढा आणि या”, असे आव्हान राऊतांनी राणेंना केले आहे.
राणे 50 वर्ष सुटणार नाही
संजय राऊत म्हणाले, “तुम्ही कायद्याचे बाप झालेले आहात का?, आज सगळे नोंद आहे, कोण कोण मला जेलमध्ये टाकतय ना. त्या सर्वांची नोंद मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना पाठविलेली आहे. कोण काय बोलतय ते. हे न्यायालयाच्या वर झालेले आहेत. चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना इकड ज्यांचे प्रत्येक वक्तव्य आम्ही पाठवित आहोत. मी हे सांगतोय, नारायण राणेंची सर्व आर्थिक प्रकरणे काढली तर ते 50 वर्ष सुटणार नाही”, असा दावा संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
झाकली मुठ सव्वा लाखाची
“मी दाखवितो, माझ्या नादाला लागू नका. झाकली मुठ सव्वा लाखाची, हे मी परत सांगतो, असे बोट दाखवित राणेंना इशारा दिला आहे. “हे काय मला जेलमध्ये, मी हिम्मतीने माझ्या पक्षासाठी जेलमध्ये गेलोय. तुमच्यासारखा पळून नाही गेलो, इडीने बोलविल्यावर मी शरणागती पत्करलेली नाही. बरे का…नामर्द नाही आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, आणि घाला मला जेलमध्ये घालताय ना. तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का?”, असे म्हणत संजय राऊतांना राणेंवर पलवार केलेला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.