HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे गटाला मोठा धक्का! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

मुंबई | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) हे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे 50 पदाधिकारी प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ठाकरे गटाला गळती लागली आहे.  या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे आज (6 जानेवारी) उद्या, अशा दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहे.

माजी नगरसेवक आणि जिल्हा संपर्क प्रमुख यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात सामील आहेत. राज्यात शिंदे सरकार आल्यापासून ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते हे शिंदे गटात प्रवेश केले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जानेवारी महिन्याच्या अखेरीस नाशिकमध्ये सभा घेण्यात येणार आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुका डोळ्यसमोर ठेवून शिंदे गटात प्रवेश होत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यादरम्यान, शिंदे गटात सामील झालेले काही पदाधिकारी पुन्हा घरवापसी व्हावी होईल, यासाठी संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर  आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोविडविरुद्ध लढ्यासाठी ‘मुंबई मॉडेल’ ची यशोगाथा जगासमोर! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Aprna

राष्ट्रवादी काँग्रेसकडून  पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी उमेदवार जाहीर  

News Desk

साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे दूरगामी धोरण आखावे – मुख्यमंत्री

News Desk