HW News Marathi
महाराष्ट्र

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक!

टोक्यो। टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला प्रथम यश मिळालं आहे. भारताच्या भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. टोक्यो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाबेनचा ३-० असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. पराभव होऊनही भाविनाने आपल्या खेळाने मने जिंकली आहेत. भारताच्या भाविनाबेन पटेलने उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा ३-२ असा पराभव केला होता.

कोण आहे भाविनाबेन पटेल?

तेरा वर्षांपूर्वी भाविनाने अहमदाबाद शहरातल्या वस्त्रापूर भागात टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली. भाविना व्हीलचेअरवर बसून खेळते. बाराव्या वर्षी तिला पोलिओ असल्याचे स्पष्ट झाले. या आजाराने खचून न जाता भविनाने दमदार वाटचाल केली आहे.

2011 मध्ये भाविनाने थायलंड इथे झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करत जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी झेप घेतली होती. 2013मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या आशियाई पॅरा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भाविनाने रौप्यपदक पटकावले होते. भाविनाने जॉर्डन, तैवान, चीन, दक्षिण कोरिया, जर्मनी, इंडोनेशिया, स्लोव्हेनिया, थायलंड, स्पेन, नेदरलॅण्डस, इजिप्त येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने भाग घेतला, पदकं मिळवली. पण सुवर्ण पदक मात्र कायम तिला हुलकावणी देत राहिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी राहणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

News Desk

शिवसेनेने घेतलेली भूमिका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी !

News Desk

मी तुम्हाला खर्च करण्यासाठी पैसे उसने देतो पण… रोहीत पवारांचा मोदींना टोला

News Desk