मुंबई | “हिंदू जन आक्रोश मोर्चा जो निघाला हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या भूमिकेविरुद्ध निघाला. आणि त्याबद्दल मी मोर्चेकरांचे अभिनंदन करतोय”, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे रविवारी (29 जानेवारी) लव्ह जिहाद आणि धर्मांतर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा (Hindu Jan Aakrosh Morcha) निघाला होता. शिवसेना भवन परिसरात हा मोर्चा काढल्यामुळे राजकीय वर्तुळा चर्चेला उधाण आले होते. हा मोर्चावर संजय राऊत यांनी आज (30 जानेवारी) माध्यमांशी चर्चा करताना राज्य सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केला.
शिवसेना भवन येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा रविवारी काढण्यात आला होता, या मोर्चात भाजपचे नेते सहभागी झाले होते, यावर संजय राऊत म्हणाले, “खरे म्हणजे हिंदुचा आक्रोश काय आहे. हे जर पाहायचे असेल तर या मोर्चेकऱ्यांनी काश्मीरला जाऊन हिंदू पंडितांचा आक्रोश पहायला हवा. आजही हजारो काश्मीरी पंडित जम्मूच्या रस्त्यावर आपल्या मागण्यासाठी आंदोनल करत आहेत. आणि संघर्ष करत आहेत, ते आपल्या घरी जाऊ शकले नाही. हा जो हिंदू आक्रोश मोर्चा काढला. तो जर मोर्चा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जो महाराष्ट्रात झाला. जे हिंदवी स्वराज संस्थापक, हिंदू रक्षक शिवाजी महाराजांचा अपमान या महाराष्ट्रात राज्यपालांनी केला. तेव्हा या मोर्चेकर गप्प का बसले होते. हा एक मोठा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचा अपमान झाल तो. तिथे त्यांचा हिंदू आक्रोश यांचा नाही. बरोबर, काश्मीरच्या बाबती हिंदू आक्रोश नाही. राम भक्तांवर गोळ्या चालविणाऱ्या मुलायम सिंग यादव यांना मोदींचे हिंदुत्ववादी सरकार पद्मविभूषण खिताब देऊन गौरव करते. वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान नाही. या सगळ्या मुद्द्यांवर हिंदू आक्रोश मोर्चा काढला असेल. त्यामुळे हा मोर्चा जो निघाला हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या भूमिकेविरुद्ध निघाला. आणि त्याबद्दल मी मोर्चेकरांचे अभिनंदन करतोय.”
मोर्चेकरी न्याय मागण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या पुतळ्यासमोर
“ती भाजपची रॅली होती. त्याला हिंदू जन आक्रोश वैगेरे जे काही नाव दिले जन आक्रोश, असे काही नव्हते. मुळात कालचा जो काही मोर्चा काढला असे म्हणतात. तो कोणी आणि कोणाविरोधात काढला हे स्पष्ट झालेला नाही. मला असे वाटते भाजप महाराष्ट्र युनिट जे आहे. त्यांचे त्यांनी हा नरेंद्र मोदीविरोधात आक्रोश मोर्चा काढला की काय?, क्षणभर असा लोकांचा गैरसमज आहे. कारण हिंदू जन आक्रोश मोर्चा जर निघाला असेल. या महाराष्ट्रामध्ये तरी आव्हान मोदींना आणि शाहना आहे. कारण नरेंद्र मोदी, अमित शाह आणि योगी आदित्यनाथ असे एकापेक्षा एक सरस देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात हे स्वत: ला कडवट हिंदूत्वादी समजून घेणार नेते आहेत. दिल्लीत आणि महाराष्ट्रात त्यांचे राज्य आणि सरकार आहे. केंद्रात आठ वर्षापासून हिंदुत्वादी सरकार आहे. आणि अत्यंत प्रबळ आणि शक्तीमान असे दोन्ही नेते आहेत. तरीही धर्मांतर होत असतील, लव्ह जिहादसारखे विषय जसे भाजप सांगते तसे घडत असतील. तर हे त्या सरकारचे अपयश आहे. आणि म्हणून ते बहुदा न्याय मागण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या पुतळ्यासमोर आणि शिवसेना भवनासमोर अत्यंत व्यथित मनाने जमलेले दिसतात,” असे संजय राऊत म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.