HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा ‘या’ कारणामुळे झाला रद्द

मुंबई | जळगावमध्ये (Jalgaon) बंजारा समाजाचा महाकुंभ मेळाव्यासाठी (Banjara Samaj Mahakumbh Melawa) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जाणार होते. परंतु, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री  यांचा जळगाव दौरा रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघे जण जळगाव जाण्यासाठी निघाले होते. परंतु, विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने जळगाव दौरा रद्द करण्यात आला.

बंजारा समाजाचा मेळाव्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर ते दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु, तांत्रिक बिघाड दूर न  झाल्याने जळगाव दौरा रद्द करण्यात आला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बंजारा समाजाचा मेळावा व्हिडीओ कॉन्फरन्सीग हजर राहण्याची शक्यता वर्तवली जातआहे.

विमानातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इगतपुरीपर्यंत गेले होते. परंतु, विमानात एअर प्रेशर योग्य नसल्याने ते परत मुंबई विमानतळावर आले. यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही शासकीय निवासस्थानी परतले. या मेळाव्यात उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत.

 

Related posts

“…चुकीचे परिणाम राजाला नाही राज्याला असतात”, उद्धव ठाकरेंचा NIT घोटाळ्यावरून मुख्यमंत्र्यांना टोला

Aprna

विधानपरिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

News Desk

Chhattisgarh Assembly Elections 2018 : ७० टक्के जनतेने केले मतदान

News Desk