HW News Marathi
अर्थसंकल्प मुंबई

‘कंत्राटदारांचे नव्हे, मुंबईकरांचे बजेट’, अर्थसंकल्पावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया

मुंबई | “गेल्या पंचवीस वर्षात कंत्राटदार सांगेल तीच कामे आणि कंत्राटदार सांगेल तेच बजेट असे जे चित्र होते ते आज अखेर बदलले आहे.  मुंबई महापालिकेचा या वर्षीचा अर्थसंकल्प मुंबईकरांच्या मागण्या, अपेक्षा मागवून त्यानुसार तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हे बजेट कट कमिशन आणि कंत्राटदारांचे नसून मुंबईकरांचे आहे”, असे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हंटले आहे.

आशिष शेलार म्हणाले, “मुंबईतील हवा प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून गेली आहे. त्यामुळे याबाबत तातडीने उपाय योजना करा, अशी विनंती  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही केली होती. त्यानुसार त्यांनी तातडीने पालिका आयुक्तांना सुचना केल्या होत्या. त्यामुळे यावेळी प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी अर्थसंकल्पात तब्बल 1500 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली त्याचे आम्ही स्वागत करतो. तसेच मुंबईकरांना चालण्यासाठी फुटपाथ देणे ही पालिकेची जबाबदारी मान्य करुन 9 मीटरपेक्षा मोठ्या प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ देण्याची भूमिका पालिकेने घेतली त्याचे मुंबईकरांच्यावतीने स्वागतच आहे”, असेही शेलार म्हणाले.

तसेच पुढे शेलार म्हणाले की नवे संकल्प केलेले नाहीत त्यामुळे काही अपेक्षा आमच्या अजूनच्या होत्या. पण करवाढ मुंबईकरांवर लादली नाही. रस्ते, आरोग्य, कोस्टलरोड, मलजल नित्सारण,अशा पायाभूत सेवा सुविधांंना केलेली तरतूद ही जमेची बाजू आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तृतीय पंथीय यांचा संवेदनशीलपणे अर्थसंकल्पात विचार केला गेला आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे कंत्राटदारांच्या मर्जीतला हा अर्थसंकल्प नसून मुंबईकरांच्या मागणीतला अर्थसंकल्प आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बोरीवलीमध्ये चार मजली इमारत कोसळली; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Aprna

आमदारांनाच गुंडाकडून धमकी – सुनिल प्रभू

swarit

सुबोध जयस्वाल यांनी स्वीकारला मुंबईच्या आयुक्त पदाचा पदभार

News Desk