मुंबई | “गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला वाटते या सरकारचा डाव तरी काय आहे. विरोधी पक्षाविरोधात मोठे कारस्थान किंवा डाव रचला जात आहे का?”, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारला केले आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. यावरून संजय राऊत यांनी आज (9 फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर विरोधकांच्या सुरक्षेवरून हल्ला बोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “उपमुख्यमंत्री जे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आपला आधीचा कार्यकाळ आठवावा. त्या कार्यकाळाची या कार्यकाळाशी तुलना करावी, जेव्हा युतीच्य काळात ते मुख्यमंत्री होते. तेव्हाचा त्यांचा कार्यकाळ आणि आता बहुतेक ते ही दिवस ढकलत आहेत. पण, त्याचा फटका राज्याच्या जनतेला बसतोय, लोक प्रतिनिधींना बसतोय. लोक प्रतिनिधी सुद्धा दहशतीखाली आहेत. विशेषतः विरोधी पक्षाचे कारण सगळ्याची सुरक्षा व्यवस्था ज्या पद्धतीने काढून घेतलेली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला वाटते या सरकारचा डाव तरी काय आहे. का मोठे कारस्थान किंवा डाव रचला जात आहे का? विरोधी पक्षाच्या आमदार, खासदार आणि नेत्यांवरती भविष्यामध्ये जीवघेणे हल्ले व्हावे. आणि त्यातून दहशत निर्माण व्हावी. कारण चित्र तसेच दिसत आहे. फक्त मिंदे गटाचे आमदार त्यांच्या पक्षात जाणार आहेत. काही लोक, त्यांच्या मागे पुढे पोलिसांचा आणि सुरक्षा रक्षकांचा लवाजवा गरज नाही. पण ज्यांना खरोखर गरज आहे. तसे अनेक लोक या महाराष्ट्रमध्ये आहेत. त्यांच्या विषय अत्यंत ढिलाईने काम केले जात आहे. मला असे वाटते गृहमंत्र्यांनी यासंदर्भात वेळीच पावले उचलली नाही. तर सगळ्यात मोठा फटका त्यांना बसून शकतो.”
मंत्रिमंडळ काम करत नाही
“पण सामान्य जनता महिला वर्ग, व्यापारी हे एका भीतीच्या सावटाखाली आहे. आदित्य ठाकरे यांच्याबाबती मराठवाड्यात जो प्रकार घडला. पोलीस कितीही सरवासारव करत असले. तरी घटना घडलेली आहे. आणि हा विषय कायदा सुव्यवस्थेसंदर्भातील आहे. त्याच मराठवाड्यामध्ये विधान परिषदेच्या सदस्या प्रज्ञा सातव या महिला आमदारावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, असे अनेक प्रकार रोज घडत आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रात घडत आहेत. याचे कारण असे आहे की, सरकारचे अस्तित्व दिसत नाही. मंत्रिमंडळ काम करत नाही”, असे म्हणत संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
विधानसभेच्या अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर नाना पटोले असती तर…
बाळासाहेब थोरातांनी दिलेला राजीनामा योग्य नव्हता, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे, पत्रकाराच्या या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “विधानसभेच्या अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर नाना पटोले असते. तर चित्र वेगळे दिसले असते. पण, विधान सभेचे अध्यक्ष पद अचानक रिकामे झाल्यामुळे आणि नंतर ती संधी आमच्या विरोधकांना मिळाली. राज्यपालांनी आणि भाजपने हा जो सरकार पाडण्याचा डाव आहे. तो अधीच रचला होता. त्यांना ती आती संधी मिळाली. आता विधानसभा अध्यक्ष पद त्यांच्याकडे नाही. राज्यपालांनी निवडणूक होऊ दिली नाही. याचा फटका सरकारला बसला, हे सत्य आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.