HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रला दिलासा! पुण्यातील १ तर पिंपरी-चिंचवडमधील ६ पैकी ४ जण ओमायक्रॉन निगेटिव्ह

मुंबई | पुण्यातील ओमायक्रॉनचा १ रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर पिंपरी-चिंचवडमधील ६ पैकी ४ जण रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आता पुण्यात ५ ओमायक्रॉनचे रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती अजित पवारांनी आज (१० डिसेंबर) ओमायक्रॉनसंदर्भात आढावा बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून अजित पवार यांनी ही बातमी दिली आहे.

फिनलंडवरून पुण्याला आलेला ओमायक्रॉन रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पुणे लसीकरणात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पुण्यात १ कोटी ३८ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती अजित पवारांनी दिला आहे. पुणे महानगर पालिकेत कोरोना बाधितांचा दर १.४ आहे. तर पुणे ग्रामीणमध्ये १.४ आहे. पुणे शहराच्या हदीत ०.३ , सीएमसीमध्ये १ टक्के, पुणे ग्रामीणला ३ टक्के असा मृत्यूदर आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये सहा जणांना ओमायक्रॉन झाल्याने एकच खळबळ उडाली होती. यात ४४ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरुष आणि अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्यी अजून २ मुलींचे ओमायक्रॉन रिपोर्ट आलेले नाही.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लस घेतली म्हणजे कोरोनामुक्त झालो अशा आविर्भावात कोणी वागू नये – राजेश टोपे 

News Desk

“…मग कोरोना लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का?”

News Desk

साताऱ्यात शिवेंद्रराजेंनी घेतली शरद पवार अन् अजित पवारांची भेट

News Desk