HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; भाजप आणि मविआ कोणाच होणार विजय

मुंबई | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या (Bypoll Election) मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. कसबामध्ये (Kasba Bypoll Election) अकराव्या फेरीपर्यंत भाजपच्या उमेदवार हेमंक रासने पिछाडीवर, तर  महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे आघाडीवर आहे. चिंचवडमध्ये (Chinchwad Bypoll Election) दहाव्या फेरीत भाजपचे अश्विनी जगताप आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीचे नाना काटे हे पिछाडीवर आहे. तसेच बंडखोर आणि अपक्ष राहुल कलाटे हे पिछाडीवर आहे.  या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे कसबा आणि चिंचवड दोन्ही मतदासंघात कोणाचा विजय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रचारासाठी पुण्यात आले होते. दुसरीकडे महाविकासआघाडीचे सुद्धा दिग्गज नेते पुण्यात प्रचारासाठी आले होते. कसबा विधानसभा मतदारसंघात 20 मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. तर चिंचवडमध्ये मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत.

दरम्यान, स्ट्रेलिमा एक्झिट पोलनुसार, कसबामध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे. तर महाविकास आघडीचे उमेदवार रविंद्रे धंगेकर हे विजयी होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचा विजय निश्चित असल्याचे स्ट्रेलिमा एक्झिट पोलने म्हटले आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव होणार आहे, असे एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या

पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू; भाजप आणि ‘मविआ’ची प्रतिष्ठा पणाला

 

Related posts

‘मनसे-भाजप युतीवर उगाच पतंग उडवण्यात अर्थ नाही’, विनोद तावडेंचं वक्तव्य

News Desk

“कोरोना हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाहीये”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावले!

News Desk

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा मला आनंदच खासदार सुप्रिया सुळेचं वक्तव्य!

News Desk