HW News Marathi
महाराष्ट्र

‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रामुळे भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळख’ – अजित पवार

पुणे। भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ राज्यातील भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळख, नवा आयाम देणारे ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच या केंद्राचं काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होऊन वेळेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षाही अजित पवार यांनी व्यक्त केली.

भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्राचे भूमीपूजन

भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रातील तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ नवीन अत्याधुनिक प्रणाली विकसित करुन भूजल विकास व व्यवस्थापन आराखडा तयार करुन तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवतील. सामान्य जनता आणि शासन यांच्यामधील दुवा बनतील, अशी खात्री अजित पवार यांनी व्यक्त केली.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्राचे भूमीपूजन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार व्हीसीद्वारे उपस्थित होते.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (व्हीसीद्वारे), जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थितीत होत्या. तर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लॉकडाऊनऐवजी कोरोनावर प्रभावी उपाय करा”

News Desk

जलयुक्त शिवार अभियानातील कामांना गती द्यावी –अर्जुन खोतकर

News Desk

विखे येताच विरोधकांकडून ‘आयाराम गयाराम जय श्रीराम’च्या घोषणा

News Desk