HW News Marathi
महाराष्ट्र

“केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात बळी गेलेल्यांपैकी मी एक” प्रताप सरनाईकांचं मोठं वक्तव्य!

मुंबई। गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य असा वाद पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक नेत्यांच्या मागे सध्या ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. यामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा देखील समोवाश आहे. भाजपा केंद्रात सत्तेत असल्यामुळे ईडीचा वापर करुन ही कारवाई करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात काही लोकांचा बळी जात आहे. यापैकी मी एक आहे असे वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणामध्ये काही लोकांचा बळी जोतो त्यातला मी

प्रताप सरनाईक म्हणाले, “मी सुरवातीपासून सांगितलेलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणामध्ये काही लोकांचा बळी जोतो त्यातला मी एक आहे. मात्र मला ईडीच्या कुठल्याही अधिकाऱ्याकडून त्रास झाला नाही. ते त्यांचं काम करत आहेत.” प्रताप सरनाईक सध्या ईडीच्या कारवाईला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमिवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर देखील ईडीनं छापा टाकला होता. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ईडीकडून ही चौकशी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात भाजपानं प्रताप सरनाईक, अनिल परब, अनिल देशमुख यांच्याविरोधात जोरदार टीका सुरू केली होती.

किरीट सोमय्या यांची टीका

तसेच गेल्या महिन्यात किरीट सोमय्यांनी प्रताप सरनाईक आणि शिवसेनेवर खोचक टीका केली होती. “१०० दिवस झाले असून प्रताप सरनाईक गायब आहेत. आम्हाला कोणीतरी ते मातोश्रीत जाऊन लपले असल्याचं सागितलं आहे. म्हणून आम्ही वर्तकनगर पोलीस ठाण्यात आमदार गायब झाल्याची तक्रार देण्यासाठी आलो आहेत. प्रताप सरनाईक मातोश्रीवर आहेत का याची चौकशी झाली पाहिजे”, असं किरीट सोमय्या म्हणाले होते. “कोविड काळात या मतदारसंघात हजारो लोक करोनाग्रस्त झाले असून आमदारांचा पत्ता नाही. मग आमदार कशासाठी आहेत? उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीत लपण्यासाठी,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला होता. अशा घोटाळेबाज आमदाराला लपवण्याचं काम करत आहेत याबद्दल आम्हाला मुख्यमंत्र्यांनाही विचारायचं असल्याचं देखील ते म्हणाले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्जुन खोतकरांच्या घर आणि कार्यालयावर ED चा छापा, आठ तासांपासून चौकशी सुरू

News Desk

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता NIA करणार

News Desk

विश्वादर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले

News Desk