HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

लोकप्रतिनिधींना अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले ? सुप्रिया सुळेंचा सवाल

मुंबई | लोकप्रतिनिधींना वारंवार अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत,याचा अर्थ गृहखात्याचा वचक,दरारा नाही काय ? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी ट्वीट करत केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

संसदेचे खासदार आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते संजय राऊत यांना एका व्यक्तीने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. देशातील एका लोकप्रतिनिधीला जर अशाप्रकारे धमकी दिली जात असेल तर ही अतिशय गंभीर बाब असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

केंद्र तसेच महाराष्ट्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्याची गरज आहे असे सांगतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी अशी विनंतीही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

संजय राऊतांना AK47 ने उडविण्याची लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यापुढे केवळ बीएस-IV मानकांच्या वाहनांचीच नोंदणी होणार

News Desk

पूनम महाजन यांनी चूक मान्य करावी, अन्यथा त्यांच्या प्रचारसभेत युवासेना सहभागी होणार नाही !

News Desk

संत भगवान बाबांची भक्ती अन् मुंडे साहेबांची शक्ती हाच तुमच्या-माझ्यातील प्रेमाचा धागा! – पंकजा मुंडे

Aprna