मुंबई | केंद्र सरकारने लोणी आणि तूप यासारख्या दुग्धजन्य पदार्थांवर पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाकडून (Department of Animal Husbandry and Dairying) आयात करण्याचा निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आक्षेप नोंदविला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. शरद पवार यांनी आज (6 एप्रिल) टाईम्स ऑफ इंडिया बातमी वाचली होती. यानंतर शरद पवारांनी केंद्र सरकारला पत्र लिहिल्याचे ट्वीट करत माहिती दिली.
शरद पवार यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, ” टाईम्स ऑफ इंडियामध्ये मला आज एक बातमी मिळाली. मी (त्या बातमीचे कटींग पण जोडलेले आहे) यात केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने लोणी आणि तूप यासारख्या दुग्धजन्य पदार्थांवर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. जर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असेल तर त्यांचा आम्ही निषेध करू. कारण, आयातीच्या परिणाम थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. कोव्हिड 19 च्या संकटातून शेतकरी आता कुठे तरी सावरत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णाने डेअरी क्षेत्राला मोठे नुकसान होईल. केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेण्यास यश आले तर मला आनंदत होईल.”
Today I came across a news in the Times Of India, a newspaper (a news cutting is attached herewith) revealing the intention of the Union Ministry of Animal Husbandry and Dairy to import Dairy products like Butter and Ghee.
Any decision by the Central Government in this regards… pic.twitter.com/VavCJJ8fuN
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 6, 2023
शरद पवारांनी पत्रात काय म्हणाले
दूध उत्पदानांची (डेअरी) आयात करण्यात आल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आता कुठे तरी दूध उत्पादक शेतकरी करोनाच्या संकटातून बाहेर येत आहे. केंद्र सरकारने लोणी आणि तूप यासारख्या दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी नुकसान करणार आहे.
देशात गेल्या 15 महिन्यात दुधाच्या दरात 12 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ कायम राहू शकते, असे तज्ञांचे मत आहे. देशात २०२२-२३ या आर्थिक वर्षात दूध उत्पादनात कोणतीही वाढ झालेली नाही. दरम्यान, लम्पी रोगाची लागण प्राण्याला झाल्यामुळे दुधाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. तर या काळात 8 ते 10 टक्केंनी मागणीत वाढ झाली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.