HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा महाराष्ट्र दौरा, रायगडाला देणार भेट

मुंबई। राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी रायगडला येणार आहे. राष्ट्रपती आज (६डिसेंबर) येणार असल्यामुळे प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात ठेवण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रपती हे हेलिकॉप्टरने येणार होते. यासाठी होळीच्या माळावर हेलिपॅड तयार करण्यात आले होते. परंतु शिवप्रेमींनी याला विरोध केल्यानंतर राष्ट्रपती रोप-वेने रायगडावर जाण्याचा निर्णय घेतला
यापूर्वी १९८५ साली तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंह किल्ले रायगडावर आले होते. यानंतर जळपास ३५ वर्षींनी देशाचे राष्ट्रपती किल्ले रायगडावर येत आहेत. यापूर्वी १९८० साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३०० व्या पुण्यतिथी निमित्ताने पंतप्रधान इंदिरा गांधी दुर्गराज रायगडवर आल्या होत्या. १९९९ सातील पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील रायगड किल्ल्याला भेट दिली होती.

पर्यटकांना सक्त मनाई

राष्ट्रपतींच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ३ ते ७ डिसेंबरदरम्यान या परिसरात पर्यटकांना प्रवेशला मनाई केली आहे. त्याचबरोबर पर्यटकांसाठी रोप-वेची सेवा देखील बंद ठेवली आहे. तसेच माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड, नातेगाव ते पाचड मार्ग सुद्धा सुरक्षेकारणांनी पर्यटकांना बंद करण्यात आले आहे.

कडेकोट बंदबस्त

रायगडाच्या २० किमी अंतरावर असलेल्या नातेखिंडीपर्यंत नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये गावकऱ्यांना आधार कार्डशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. या परिसरात स्थानिक पोलीस आणि एसआयटीसह पोलिसांच्या तुकड्या देखील करण्यात आल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सलमान खानच्या जामीनावर उद्या सुनावणी

News Desk

भारतीय हॉकी संघाचं दमदार पुनरागमन, स्पेनचा ३-० ने पराभव!

News Desk

भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात, जीवितहानी नाही

Gauri Tilekar