HW News Marathi
महाराष्ट्र

‘किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा’ – महेश तपासे

मुंबई | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर व कुटुंबावर किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे आरोप केले असून या आरोपाचा महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

अल जेब्रिया कोर्ट संदर्भात किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत आरोप केला आहे. मात्र या इमारतीचे मालक अर्शद सिद्दीकी यांनी या मालमत्तेच्या व्यवहारासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाचा संबंध नाही असे स्पष्टीकरण दिले आहे असेही महेश तपासे म्हणाले आहेत.

दरम्यान भाजप नेते वारंवार असे बेछूट आरोप करुन महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना बदनाम करत आहेत. राजकारण करावे परंतु वस्तुस्थिती काय आहे हे समजून आरोप केले तर उचित होईल. एखाद्या नेत्याला बदनाम करण्याचे कटकारस्थान ताबडतोब थांबवावे असा इशाराही महेश तपासे यांनी दिला आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या

किरीट सोमय्या यांनी विडिओच्या माध्यमातून हा गौप्स्फोट केला आहे. ते म्हणाले, “आयकर विभागाने समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि छगन भुजबळच्या १०० कोटीच्या बेनामी मालमत्ता जप्त केल्या आहेत. कोलकाताच्या बोगस सेल कंपन्यांद्वारे हे मनी लॉंडरिंग करण्यात आलं होतं.अंजली दमानिया, किरीट सोमय्या आम्ही वेगवेगळ्या कोर्ट याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. ईडी, एससीबी आणि आता आयकर विभाग, याच्या अंतर्गत आयकर विभागने जी प्रेस नोट इशू केली आहे, सेशन कोर्ट मध्ये दावा दाखल झाला आहे, आणि त्यांना ७ वर्ष पर्यंत साज होऊ शकते”, असा विडिओ त्यांनी टाकला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील रस्ते सुधारणा कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Aprna

पुण्यात शिवसेनेनला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते ही हतबलता !

News Desk

“सुप्रिया सुळे, नीलम गोऱ्हे, यशोमती ठाकूर हरवल्या, शोधणाऱ्यास ५०० रुपये बक्षिस देऊ” भूमाता ब्रिगेडचा स्टंट

News Desk