HW News Marathi
महाराष्ट्र

“राणेंच्या विधानाचं समर्थन करत नाही पण भाजप राणेंच्या पूर्णपणे पाठिशी” – देवेंद्र फडणवीस

मुंबई। नारायण राणेंनी जे वक्तव्य केलं आहे. तो कायदेच्या भाषेत दखलपात्रं गुन्हा नाही. आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का? जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा, अशी भाषा पोलीस आयुक्त वापरत आहेत. कोणत्या कायद्याने पोलीस आयुक्तांना हा अधिकार दिला आहे?, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मी आयुक्तांची नोटीस वाचली

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीसह पोलिसांनाही सवाल केले. नारायण राणेंनी जे वक्तव्य केलं आहे. तो कायदेच्या भाषेत दखलपात्रं गुन्हा नाही. आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का? मी आयुक्तांची नोटीस वाचली. त्यात, जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा, असे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्या कायद्याने पोलीस आयुक्तांना हा अधिकार दिला आहे, असा सवाल करतानाच तुम्ही जे सेक्शन लावले त्याबाबत पहिली त्यांची जबानी घ्यावी लागेल. त्यांची बाजू ऐकावी लागेल नंतरच कारवाई करावी लागेल, असं फडणवीस म्हणाले.

राणेंच्या विधानाचं समर्थन करत नाही

पण भाजप राणेंच्या पूर्णपणे पाठिशी

मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीबाबत बोलणं कोणत्याही चुकीच्या विधानाचं समर्थन केलं जाणार नाही. आम्ही नारायण राणेंच्या विधानाचं समर्थन करत नाही. पण भाजप राणेंच्या पूर्णपणे पाठिशी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हे कायद्याचं राज्य आहे, तालिबान नाही

आमच्या कार्यालयावर दगडफेक केली तर खबरदार. आम्ही हे खपवून घेणार नाही. दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही. शिवसैनिक दगडफेक करत आहेत, ते म्हणतात आम्ही उद्धवजींच्या आदेशाने करत आहोत. भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला तर खबरदार, आम्ही हिंसा करत नाही, पण आमच्या कार्यालयावर हल्ला केला तर आम्ही सहन करणार नाही. आमच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही त्या त्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन करु. हे कायद्याचं राज्य आहे, तालिबान नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

चौकीदार चोर है म्हणता त्यावर गुन्हे दाखल का होत नाही?

तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना निर्लज्ज म्हणता, मंत्र्यांना लाथा घाला म्हणता, चौकीदार चोर है म्हणता त्यावर गुन्हे दाखल का होत नाही? आमच्या कुटुंबा विरोधात, पत्नी विरोधात तुम्ही काय काय म्हणता त्यावर कारवाई होत नाही, ही दुटप्पी भूमिका घेऊन चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

आम्ही थांबणार नाही

अवैधपणे राणे साहेबांना अटक केली तरी जन आशिर्वाद यात्रा थांबणार नाही. प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वात ही यात्रा सुरु राहील. युवासेनेने कार्यक्रम करायचे, त्यांच्यावर कारवाई नाही, आणि आमच्यावर कारवाई.. हरकत नाही. आमची यात्रा थांबणार नाही. पोलिसांच्या भरवश्यावर भाजपला रोखण्याचा प्रयत्न गेल्या 50 वर्षापासून होत आहे. पण आम्ही थांबणारे नाही, थांबणार नाही, कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी आमची वाटचाल सुरूच राहील, असं ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये – रोहित पवार

News Desk

पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका या मागणीसाठी वारकरी शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

News Desk

भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील! – मुख्यमंत्री

Aprna