HW News Marathi
महाराष्ट्र

“एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, तुटेपर्यंत ताणू नये!” – अनिल परब

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्या, उद्यापर्यंत कामावर हजर व्हा, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. एसटी आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तसेच आम्ही उद्या सकाळपर्यंत कर्मचारी कामावर येण्याची वाट पाहू, मग कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील परबांनी आज (२५ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन तुटेपर्यंत ताणू नये. त्यानंतर परत जोडता येणार नाही, असे सूचक विधान केले आहे. एसटीचे विलीनीकरणाचा मुद्दा हा न्यायप्रविष्ट असून मुंबई उच्च न्यायालय विलीनीकरणाचा जो निर्णय येईल, तो आम्ही मान्य करू, असेही परब म्हणाले. तर एसटीच्या संपामुळे जनतेला त्रास होत आहे. कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरू नका, असे पुन्हा एकदा आवाहन परबांनी केले आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मागणीवर ठाम आहे. जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज आझाद मैदानातून सरकारला दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्क्यांने वाढ

एसटीच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने काल (२४ नोव्हेंबर) त्यांच्या वेतनात ४१ टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व लिपिकांच्या पगारात सुमारे ७२०० रुपयांपासून ३६०० रूपयांपर्यत घसघशीत वाढ केली आहे, अशी घोषणा परबांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. यापुढे कामगारांचा पगार दर महिन्याच्या १० तारखेपर्यत होण्याची हमी राज्य शासनाने घेतली आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘संजय राऊतांचं असंय, खातात शिवसेनेचं पण निष्ठा शरद पवारांवर’ – गोपीचंद पडळकर

News Desk

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई न मिळल्यास आंदोलनाचा इशारा – उद्धव ठाकरे

News Desk

गोसलिया कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळावा

News Desk