मुंबई | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि वानखेडे यांच्या कुटुंबियांवर वारंवार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याविरोधात समीर वानखेडेंचं वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत त्यांच्या अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली आहे. यावर आज (२२ नोव्हेंबर) सुनावणी झाली.
दरम्यान, कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल कोणत्याही प्रकराचं विधान करण्यापूर्वी त्यांची माहिती पडताळून घेतली पाहिजं. मलिकांनी वानखेंडेंवर केलेल आरोप हे पूर्णपणे चुकीचं आहे, असे आताच बोलणे योग्य ठरणार नाही. मलिक हे सोशल मीडियावर पोस्ट करू शकतात. मात्र, मलिकांनी कोणत्याही गोष्टी पूर्णपणे पडताळणी करून पोस्ट करावी,” असे न्यायालयानं म्हटलं. यानंतर मलिकांनी ट्वीट करत म्हटलं, “सत्यमेव जयते, अन्यायाविरुद्ध लढा सुरूच राहणार” केली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी आता २० डिसेंबरला होणार आहे.
सत्यमेव जयते
अन्याय के खिलाफ हमारी जंग जारी रहेंगी— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 22, 2021
‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे आपल्या ट्विटर अकाउंट वरून फोटो पोस्ट करताना म्हणतात. की, ‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’ कबूल है, कबूल है, कबूल है… असे कॅप्शन देत नवाब मलिक यांच्याकडून ट्विट करत समीर वानखेडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. समीर वानखेडे हे हिंदू नसून मुस्लिमच असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यांनी याबाबत अनेकदा पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे देखील सादर केले आहेत. आज पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर ‘फोटोवॉर’ करत नवीन गौप्यस्फोट केलाय. त्यांनी वानखेडे यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. आणि या फोटोमध्ये समीर वानखेडे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत. या फोटोमुळे वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.
Photograph of Sameer Dawood Wankhede signing his 'Nikah Nama' pic.twitter.com/lSQz56RqoW
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 22, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.