मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचं सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांच्या गुप्त बैठक सुरू आहे. ही बैठक वरळीतील नेहरू सेंटरमध्ये सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत राज्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एसटी संपाबाबत शरद पवार काय सल्ला देणार ?, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर काय खलबतं सरू आहे. गेल्या दीड तासपासून तिघांमध्ये चर्चा सुरू आहे.
कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मागणी पूर्ण करा, शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे सोयी मिळाव्यात ही मागणी असून सरकार काय भूमिका मांडणार यावर चर्चा करणार आहोत. कर्मचाऱ्यांच्या संघटितपणा आणि एकजुटीचं हे यश असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी टीव्ही ९ला म्हणालं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.