HW News Marathi
महाराष्ट्र

“देशमुखांना जेलमध्ये टाकलंत, आज ना उद्या किंमत मोजावीच लागेल!”- शरद पवार

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये टाकलं त्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही, असा धमकी वजा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला दिला आहे. पवारांनी विदर्भाच्या दौऱ्यात काल (१७ नोव्हेंबर) सभेतून त्यांनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली आहे. “राज्य चालवायचं असते ते दिलदारपणं. सत्तेचा वापर करायचा सन्मानानं. सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचं. मात्र, ज्यांचे पाय जमिनीवर राहात नाहीत व सत्ता डोक्यात जाते त्यांच्या हातून सत्त गेल्यावर असं घडतं, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीकास्त्र केले आहे.

देशमुखांना मनी लॉंड्रिंग प्रकरणात विशेष न्यायालयाने २९ नोव्हेंबरपर्यं कोठडी सुनावली आहे. पवार म्हणालं, “राज्यातील सरकार आपल्या हातून गेलं म्हणून काही करता येत नाही. त्यामुळे अशाप्रकारे त्रास देणे, अटक करणे, बदनामी करणे हे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. तुम्ही कितीही छापे मारा आज ना उद्या ही सगळी शक्ती सामान्य माणसांचा पाठिंबा घेऊन कधीही तुम्हाला राज्यात सत्तेत येऊ देणार नाही,” असेही ते म्हणालं. “काही अस्वस्थ लोक याद्या तयार करून दिल्लीला पाठवतात आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी करतात. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेतृत्व केले. त्यांनी पक्ष बदलल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ईडीने चौकशीसाठी बोलावले”.

अनिल देशमुखांना २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष न्यायालयीनं २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. देशमुखांची आज (१५ नोव्हेंबर) यांच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. देशमुखांची कोठडीची मुदत संपल्यामुळे पुन्हा त्यांना न्यायलयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने देशमुख यांना आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुखांना २ नोव्हेंबरला अटक करण्यात आले होते. तर मुंबई उच्च न्यायालयात ७ नोव्हेंबर रोजी ईडीच्या कोठडीत पाठविण्यात आले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंना हायकोर्टाचा दणका ,सुनावणी उद्याच !

News Desk

आता मध्य आणि पश्चिम रेल्वेने थकवले पाण्याचे २३३ कोटींच बिल

News Desk

गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अनिल देशमुखांची उच्च न्यायालयात धाव

News Desk