HW News Marathi
महाराष्ट्र

जमावबंदीतही आंदोलन, सोयाबीन-कापसाच्या उत्पादकांसाठी स्वाभीमानीचा अन्नत्याग!

बुलडाणा। राज्यातील लाखो सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी आरपारची लढत ठरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने अनेक अडचणींचा सामना करीत निर्णायक टप्पा गाठला आहे. आता या महाआंदोलनाने अन त्याचे नेतृत्व करणाऱ्या रविकांत तुपकरांनी उपराजधानीत लागू संचारबंदी अन पोलिसांनी बजावलेल्या नोटीसा धुडकावून लावीत संविधान चौकात आज बुधवारच्या मुहूर्तावर आपले सत्याग्रहवजा अन्नत्याग आंदोलन सुरू करून उदया (18 नोव्हेंबर ) सुरू होणाऱ्या विदर्भ-मराठवाडा व्यापी आंदोलनाचं रणशिंग फुंकले! राज्याच्या 50 टक्के म्हणजे 45 लाख हेक्टर क्षेत्रावर यंदाच्या खरिपात सोयाबीनचा पेरा झाला. कपाशीचा पेराही लक्षणीय ठरावा. मात्र आधी अस्मानी व नंतर सुलतानी संकटांनी लाखो उत्पादकांना उध्वस्त करण्याचे पाप केले.

व्यापाऱ्यांवर साठा मर्यादा लादण्याचा घातकी निर्णय

सोयाबीन चे भाव 11 हजार क्विंटलवर असताना केंद्राने लाखो मेट्रिक टन सोयापेंड आयात करण्याचा, पामतेल व खाद्य तेल आयातीवर आयात शुल्क शून्य करण्याचा, स्थानिक व्यापाऱ्यांवर साठा मर्यादा लादण्याचा घातकी निर्णय घेतला. कपाशीची उत्पादन कमी असल्याने मिळणारा भाव परवडत नाही. हाती आलेल्या पिकांना कवडीमोल भाव अन सरकारने दिलेली मदत भिकेसारखी! पीक विमा कंपन्या तर लुटायलाच बसलेल्या. महावितरणे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापून लावलेला मनमानी कारभार, याउप्परही लाखो उत्पादक शेतकऱ्यांच्या अश्रू व समस्यांकडे प्रस्थापित पक्ष, नेते, सत्ताधारी व विरोधक सर्वांनीच पाठ फिरविली, आज 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास, नेत्याप्रमाणेच आक्रमक झालेले कार्यकर्ते अन शेतकरी यांचा गराडा अन गगनभेदी घोषणांच्या तालावर निर्भयपणे रविकांत तुपकर आंदोलनस्थळी विसावले. यावेळी त्यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलतांना वरील शब्दात राजदरबारी देखील उपेक्षित लाखो शेतकऱ्यांची कथा अन व्यथा मांडली.

सर्वांनाच आडव्या हाताने फैलावर घेतले

त्यांची शोकांतिका, त्यांच्या कुटुंबांची फरफट, जीवन मरणाचा संघर्ष, अन त्यापलीकडे गेल्यावर, जगणं अशक्य झाल्यावर सुरू असलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या मालिकेचा लेखाजोखा सादर केला. यावेळी उपोषण स्थळ सुन्न झाल्याचे अन एरवी निर्विकारपणे घडामोडी टिपणारे प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी देखील गहिवरून अंतर्मुख झाल्याचे दिसून आले. दरम्यान नागपुरातील संचारबंदी, संभाव्य कोरोना प्रसाराची शक्यता अन पोलिसांनी बजावलेल्या नोटिसा यावर माध्यमांनी विचारले असता तुपकर भडकले आणि त्यांनी सर्वांनाच आडव्या हाताने फैलावर घेतले. पोलिसांचे दर आंदोलनावेळी मिळणारे नोटीस रुपी लव्ह लेटर्स, गुन्हे अन केसेस आम्हाला काही नवीन नसून संचारबंदी अन या नोटिसा यांना स्वाभिमानी मोजत नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले, पोलीस, जिल्हा प्रसाशनावर थेट अन आजपासून विदर्भात असलेले मोठ्या नेत्यांचे दौरे, कालपरवा झालेला भाजपच्या कार्यक्रमावर अप्रत्यक्ष टोला लागवताना त्यांनी मोठ्या नेत्यांच्या मोठ्या कार्यक्रमाला परवानगी देऊन अधिकारी शेपूट घालतात.

कोविड प्रूफ जाकीट घालतात काय?

दुसरीकडे आमच्या सारख्या सामान्य शेतकऱ्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारतात याला काय म्हणावं? आमच्यामुळे कोरोना फैलावतो अन मग मोठे नेते अन त्यांचे चेले काय कोविड प्रूफ जाकीट घालतात काय? असा करडा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी एकाला एक न्याय अन दुसऱ्याला एक न्याय असा पक्षपात करू नये असे बजावून शेतकऱ्यांचे हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर लाखो शेतकरी रस्स्यावर उतरतील असा खळबळजनक इशाराही तुपकरांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजुभाऊ कोंगे याचा उपोषणाचा इशारा

News Desk

पृथ्वीराज चव्हाणांना निवडून येण्यासाठी शरद पवारांची गरज लागते…काॅंग्रेसच्या ज्येष्ठांवर सेनेचा घणाघात !

News Desk

३ हजार कोटींची बेकायदेशीर उलाढाल करणाऱ्या मुंबईतील टॅंकर माफियांवर कारवाई करा! – आशिष शेलार

Aprna