HW News Marathi
महाराष्ट्र

“दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करणं हे भाजपचे षडयंत्र!”

मुंबई | त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भाजपचे षडयंत्र असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या षडयंत्राला राज्यातील जनतेने बळी पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता राखावी, असे आवाहनही पटोलेंनी जनतेला केले आहे. त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड, मालेगावसह काही भागात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. या दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपचा नेहमीप्रमाणे डाव आहे, असा आरोपही पटोलंनी केला आहे.

त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भाजक्षचे षडयंत्र असून या षडयंत्राला राज्यातील जनतेने बळी पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता राखावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

काल आणि आज अमरावतीसह काही भागात घडलेल्या हिंसक घटनांचा तीव्र निषेध करून नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे सरकार दोन वर्षापासून स्थिर असून भाजपने हे सरकार अस्थिर करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रात अशांतता पसरवून सरकार पाडण्याचे सर्व प्रकारचे उद्योग झाले त्यात महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देशभर भारतीय जनता पक्षाच्याविरोधात तीव्र असंतोष आहे. या मुख्य मुद्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून, असे षडयंत्र केले जात आहे. हिंसक कारवाया करणाऱ्यांवर व अफवा पसरवणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी.

समाजातील दोन घटकांमध्ये तेढ निर्माण करुन त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करणे हा भाजपचा इतिहास राहिला आहे. देशातील ज्वलंत प्रश्नावर जनतेच्या आक्राशोला त्यांना तोंड देता येत नाही. तर जनतेमध्ये भाजप व मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाचा फटका उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये म्हणून दंगली पेटवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजप हा कुटील हेतू ओळखून षडयंत्राला बळी पडू नये, राज्यात शांतता राखावी, असे आवाहन पटोलेंनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ शिंदेनी आदिवासी महिलांकडून राखी बांधून घेत केला सण साजरा!

News Desk

“…वाटेला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Aprna

उस्ताद गुलाम मुस्तफा खान, पं. अरविंद पारिख यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

News Desk