HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतील सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत सुरू!

मुंबई। मुंबई महानगरपालिकेने नवीन नियमावली जाहीर केली आहे. यानुसार आता निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेत मुंबईतील सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी कोविड संबंधित सर्व नियमांचे अर्थात सोशल डिस्टन्सिंग, चेहऱ्यावर मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने एक पत्रकही काढलं आहे.

सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

आपल्या पत्रकात मुंबई महानगरपालिकेने म्हटलं आहे की, कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यात अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन कोविड प्रसाराला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात निर्बंधांबाबत यापूर्वी वेळोवेळी पारित केलेले आदेश या आदेशाद्वारे रद्द करण्यात येत आहेत. तथापि, राज्य शासनाच्या आदेशातील अनुक्रमांक 8मध्ये दिलेल्या अधिकारानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या आणि समुद्रकिनारे केवळ सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणेंच्या जनआशिर्वाद यात्रेमुळे मविआ सरकारला कोणताही धोका नाही”- विनायक राऊत

News Desk

गर्दीत कोरोना चेंगरून मेला की काय असे मला वाटले!

News Desk

‘त्या’ चार कंपन्यांची राज्यात होणारी गुंतवणूक परकीय

Aprna