HW News Marathi
महाराष्ट्र

पडळकर अन् खोत ST कर्मचाऱ्यांच्या पगारांची जबाबादारी घेणार का? परबांचा सवाल

मुंबई | “पडळकर आणि सदाभाऊ खोत हे कर्मचाऱ्यांच्या पगारांची जबाबादारी घेणार का ?,असा सवाल राज्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. जर कामावर नसतील तर पगारही होणार नाही. संप सुरू राहिल्यास कामगाऱ्यांच्या अडचणीत वाढतील, असंही परब म्हणाले. जर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागं घ्यावे, असे आवाहन केला.

तसेच एसटी कर्मचारी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांना त्रास देण्याची इच्छा नाही, असेही परबांनी स्पष्ट केलं. एसटी कर्मचाऱ्यांनी मागं न घेता, संप सुरू ठेवला. सर्वात जास्त नुकसान हे कामगारांचे होणार नाही, असे सूचक विधान परबांनी माध्यमांशी बोलातना केलं आहे.

विलिनीकरणाची मागमी एक दोन दिवसात होणार नाही

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरणाची एक दोन दिवसांत होणार नाही. तसेच सरकार कुठेही कमी पडलेलं नसून आम्ही न्यायालयाला लेखी दिलं आहे. एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा राजकीय लावून धरलेला असून भाजप याला खतपाणी घालतं. आणि कामगारांनी भाजपच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन परबांनी केलं आहे.

राज्यभरातील ३७६ एसटी कर्मचार्‍यांचं निलंबित

राज्य सरकारने देखील कडक भूमिका घेत, राज्यभरातील ३७६ एसटी कर्मचार्‍यांना निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकार त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती परबांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्याचबरोबर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर बोलताना परब म्हणालं की, “पडळकर आणि सदाभाऊ खोत हे कर्मचाऱ्यांच्या पगारांची जबाबादारी घेणार का ?,असा सवाल त्यांनी विचारला आहे”. भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला खतपाणी घालत असल्याचा आरोपही परबांनी केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंनी सिंधुदुर्ग येथे एमएसएमई-तंत्रज्ञान केंद्राच्या स्थापनेची केली घोषणा

News Desk

उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील, चंद्रकांत पाटलांचं चॅलेंज

News Desk

पुण्यात पीएमपीएल बस पुलावरून कोसळली

News Desk