HW News Marathi
महाराष्ट्र

“फडणवीसांनी गुन्हेगारांना सरकारी आयोग, महामंडळाचं अध्यक्षपद का?” | मलिक

मुंबई | विरोधीपक्ष नेतं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी असताना गुन्हेगारांना सरकारी आयोग आणि महामंडळाचं अध्यक्षपद दिलं होतं, असा सवाल राज्याचं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विचारला आहे. यात नागपूरमधील कुख्यात गुंड मुन्ना यादवला फडणवीसांनी बांधकाम महामंडळाचं अध्यक्षपद दिलं. तसेच हैदर आजम हा बांग्लादेशी नागरिकांना भारतात वसवण्याचे काम करत असून आझमला मौलाना आझाद महामंडळाचं अध्यक्ष पद देण्यात आले, असे गंभीर आरोप मलिकांनी आजच्या (१० नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत केला आहे.

अंडरवर्ल्डशी संबंधित रियाज भाटी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत कसा पोहोचला? आणि रियाझ भाटीचे पंतप्रधानांसोबतही फोटो?, गुंड सहजपणे पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचतोच, असा सवाल ही मलिकांनी पत्रकार परिषदेतून फडणवीसांना विचारला आहे. तसेच रियाझ भाटी हा दाऊद इब्राहीमचा माणूस आहे, असल्याचा खुलासा मलिकांनी केला आहे. तसेच रियाज भाटीला सहारा विमानतळावर दोन बनावट पासपोर्ट प्रकरणात पडण्यात आलं होतं. मात्र, त्याला २ दिवसात जामीन कसा मिळाला?, फडणवीसांचे भाटींशी संबंध का?, असे अनेक प्रश्न मलिकांनी फडणवीसांना विचारला आहे. मलिकांच्या प्रश्नांना आता फडणवीस काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नोटाबंदीनंतर बनावट नोटांच्या रॅकेटला फडणवीसांची सुरक्षा!

पंतप्रधानांनी देशातील काळा पैसा आणि बनावट नोटांना आळा घालण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यावेळी फडणवीसांनी हे बनावट नोटांचं रॅकेट चालवत होतं, असा आरोप मलिकांनी केला आहे. या काळात राज्यात एकही बनावट नोट सापडली नाही. कारण बनावट नोटांचं रॅकेट हे फडणवीसांच्या पाठिंबा असल्याचंही मलिकांनी सांगितलं. ८ ऑक्टोबर २०१७मध्ये इंटेजिलन्सनं बीकेसीमध्ये छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी १४ कोटी ५६ लाखांच्या खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. परंतु फडणवीसांनी दाबण्याचा प्रयत्न केला, असे ही मलिकांनी म्हणालं

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वारीतील भाविकांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात! – डॉ.नीलम गोऱ्हे

Aprna

नितीन गडकरी म्हणाले…..पुढील ३ वर्षात!

News Desk

ED कडून खडसेंनी तब्बल 9 तास चौकशी ! बाहेर पडल्यावर काय दिली प्रतिक्रिया ?

News Desk