HW News Marathi
महाराष्ट्र

सुहास कांदे-छगन भुजबळ वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; प्रशासनाला पाठवली कागदपत्रे

मुंबई। शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद खूप दिवसांपासून सुरुच आहे. त्यात आता कांदे-भुजबळ यांच्या वादाची दखल अखेर मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यांनी प्रशासकीय कागदपत्रे मागवली असून, ते यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. नियोजन समितीचा निधी विकल्याचा आरोप करत आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. ही याचिका मागे घ्यावी म्हणून आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचा आरोपही आमदार कांदे यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

आमदार कांदे यांचे सारे आरोप फेटाळून लावले

सुहास कांदे यांनी याबाबत पोलिस आयुक्तांना पत्र देत तक्रार केली होती. मात्र, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांचे सारे आरोप फेटाळून लावले. या साऱ्या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आमदार कांदे आणि निकाळजे हे कुठलेही कॉल रेकॉर्डिंग सादर करण्यास असमर्थ ठरले. हा चौकशी अहवाल पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी स्वतः या दोघांची चौकशी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आमदार सुहास कांदे यांचा जबाब घेतला.

कांदे यांच्याविरोधात खटला

अक्षय निकाळजे यांचा जबाब नोंदवण्यात आला. आता या जबाबानंतर अक्षय निकाळजे यांनी कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. कारण आमदार कांदे यांच्याकडे आपल्याविरोधात एकही पुरावा नाही. भुजबळ यांच्याविरोधातील खटला मागे घ्यावा म्हणून मी धमकी दिल्याचे वृत्त पूर्णतः खोटे आहे. माझे कांदे यांच्याशी फोनवर बोलणे झाले, पण ते आमच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीबाबत होते. धमकीचा तर प्रश्नच येत नाही. त्यांनी केलेल्या आरोपामुळे मला भावनिक त्रास झाला. प्रतिमा खराब झाली. त्यामुळे मी कांदे यांच्याविरोधात खटला दाखल करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी न्यायमूर्ती अभय ठिपसेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

swarit

राष्ट्रवादी -शिवसेना -भाजप नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता ? संजय राऊत!

News Desk

शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द नाही तर स्थगित, खडसेंनी दिली माहिती

News Desk