HW News Marathi
महाराष्ट्र

आर्यन खान डील प्रकरणात समीर वानखेडेंचा संबंध?; साक्षीदार विजय पगारे यांचा मोठा खुलासा


मुंबई। क्रूझ ड्रग्ज प्रकरण आणि आर्यन खान प्रकरणात नवनवे खुलासे होत असून हे प्रकरण आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलं आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी आणि मनीष भानुशाली, सॅम डिसुझा आणि सुनील पाटील यांच्यात डील झाल्याचं समोर आलं. यात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा संबंध असल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान, याबाबत या प्रकरणातील आणखी एक साक्षीदार विजय पगारे यांनी माध्यमांसमोर येऊन मोठा दावा केला आहे. ज्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढू शकतात.विजय पगारे यांनी माध्यमांना मुलाखत दिली. यावेळी त्यांना आर्यन खान प्रकरणात झालेल्या डीलमध्ये समीर वानखेडे यांचा संबंध आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना याबाबत मी खात्रीशिरपणे काही सांगू शकत नाही. पण भानुशालीने बोलता बोलता एकदोन वेळा समीर वानखेडेंचं नाव घेतलं होतं. वानखेडे साब से बात हुथी क्या, वानखेडे साहबसे बात हुई थी क्या असं तो बोलत होता, असं विजय पगारे यांनी सांगितलं.

गोसावीच्या सेल्फीमुळे १८ कोटी गेले

किरण गोसावी आणि मनीष भानुशाली त्यादिवशी दिवसभर सतत टीव्हीवर दिसत होते. सुनील पाटील सोबत ४ तारखेला माझं बोलणं झालं. त्यावेळी त्याने किरण गोसावीच्या मस्तीमुळे एक सेल्फी आपल्याला १७ कोटी रुपयांना पडला आहे. किरण गोसावीमुळं हातात आलेला सर्व पैसा परत गेला, असं सांगितलं. त्यावेळी मला लक्षात आलं आर्यन खानला फसवलं जात आहे म्हणून मी लगेचच माझ्या एका मित्राला घेऊन किल्ला कोर्टात गेलो. तिथं आर्यन खानला आणण्यात आलं होतं. त्यावेळी मी सतीश माने शिंदे यांना भेटून आर्यन खानला फसवलं आहे असं सांगितलं परंतु त्यांनी विश्वास ठेवला नाही, असं विजय पगारे यांनी सांगितलं.

आर्यन खानला अडकवलं गेलं

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यात आलं आहे, असा खळबळजनक दावा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार विजय पगारे यांनी केला आहे. तसंच, आर्यन म्हणचे वकील सतीश मानेशिंदे यांना भेटून आर्यन खान यांना फसवलं आहे असं सांगितलं होतं. परंतु , त्यांनी माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवला नाही, असा खुलासा देखील त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंदुस्थानी भाऊचं ‘ते’ चिथावणीखोर वक्तव्य नेमकं काय?

News Desk

“वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार?”

News Desk

कोरोना काळातील विजबिले कमी करण्याची मुंबई भाजपची मागणी

News Desk