HW News Marathi
महाराष्ट्र

समीर वानखेडेंच्या जीवाला धोका, केंद्राने दिली Z Plus सुरक्षा

मुंबई। आर्यन खान क्रूझ ड्र्ग्ज प्रकरणात कारवाई करणारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंविरोधात सध्या अनेक आरोप केले जात आहेत. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी तर पत्रकार परिषद घेत वानखेडेंचे जातीय प्रमाणपत्र खोटं असल्याचे म्हणते बॉलिवूडमध्ये ते वसूलीचे रॅकेट चालवत असल्याचे गंभीर आरोप केले. तसेच वानखेडे एक फर्जी अधिकारी असल्याची टीका केली. त्यामुळे वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील शाब्दिक वाद अगदी टोकाला पोहचला आहे. अशातच समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने समीर वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

समीर वानखेडेंच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता

समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ करत गृहमंत्रालयाने त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची निर्यण घेतला आहे. त्य़ामुळे समीर वानखेडेंच्या सुरक्षेसाठी ११ सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत. यात दोन कमांडोज, दोन पीएसओ अधिकारी असतील. मुंबईत २ ऑक्टोबरला कॉर्टेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंनी कारवाई केली. मात्र प्रकरणात आता अनेक नवे खुलासे होत आहे. त्यामुळे समीर वानखेडेंच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. याचपार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.यापूर्वी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि त्यांची बहीण जास्मीन वानखेडे यांनीही आमच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. तर अनेकांकडून जाळून टाकेन, मारुन टाकेन अशा धमक्या येत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

कोणाला सुरक्षा पुरवली जाते Z+ ?

प्रसिद्ध राजकीय नेते, कलाकार, उद्योजक आणि क्रीडापटू यांना सरकारकडून सुरक्षा दिली जाते. त्यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना कुठल्या दर्जाची सुरक्षा द्यायची, याचा निर्णय सरकारकडून घेतला जातो.एक्स, वाय, झेड आणि एसपीजी कमांडो असे सुरक्षेचे विविध प्रकार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्तव्य बजावताना ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडल्यास, पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांचे अनुदान !

News Desk

पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी राम कदम पुढे आले

News Desk

हर्षवर्धन पाटलांच्या शेजारी अजित पवार बसले ,कारण …

News Desk