HW News Marathi
महाराष्ट्र

नवाब मलिक वैफल्यग्रस्त झालेत प्रविण दरेकरांची टीका!

नांदेड। सध्या राज्याचं राजकारण केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे ढवळून निघाल आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असतात. विशेषतः यात भाजपचे किरीट सोमय्या हे आघाडीवर असतात. आणि सत्ताधारी पक्षाकडून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे आघाडीवर असतात. आणि यात समीर वानखेडे यांच्यावर देखील नवाब मलिक आरोप करत आहे. आता याच पार्श्वभूमीवर आता प्रविण दरेकर यांनी देखील उडी घेतली आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंना जेल मध्ये पाठविण्याची भाषा करण्यापेक्षा आपण जेल मध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी असा टोला नवाब मलिक यांना भाजपचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लावलाय. त्यांचा जावाई आठ वर्ष झाले जेल मध्ये आहे. त्यामुळे मलिक वैफल्यग्रस्त झालेत, अशी टीका दरेकर यांनी केलीय. प्रवीण दरेकर आज नांदेड मध्ये बोलत होते.

वानखेडे यांना लक्ष्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील आरोप – प्रत्यारोपांची मालिका वाढतच आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला कोर्डिलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणात अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना लक्ष्य करत खळबळजनक आरोप केले होते. मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत.

धक्कदायक दावा केला

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरुद्धच्या आरोपांची धार कायम ठेवत गुरुवारी आणखी एक धक्कदायक दावा केला आहे. नवाब मलिकांच्या आरोपांचे समीर वानखेडे यांनीही खंडन करत आरोप नाकारले आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रकरणात नवाब मलिक व समीर वानखेडे यांच्यातील वाद नेमके काय आहेत याचा घेतलेला आढावा. नवाब मलिक यांचे समीर वानखेडेंवर केलेले आरोप व समीर वानखेडे यांनी दिलेली उत्तर.

त्यांना मी कायदेशीर मार्गाने उत्तर देणार

मंत्री मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत. माझी बहीण यास्मिन वानखेडे हिच्यासोबत मी कधीही दुबई किंवा मालदीवला गेलेलो नाही. सेवेत रुजू झाल्यानंतर माझा एकही दुबई प्रवास झालेला नाही. मी जो मालदिवला गेलो होतो तो माझ्या खर्चाने गेलो होतो. त्यासाठी मी रितसर सुट्टी घेतली होती’, असे नमूद करत समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांचे आरोप फेटाळले. माझ्यावर, माझ्या दिवंगत आईवर, निवृत्त सैनिक असलेल्या माझ्या वडिलांवर, माझ्या बहिणीवर मलिक गेले १५ दिवस खोटे आरोप करत आहेत. त्यांना मी कायदेशीर मार्गाने उत्तर देणार आहे, असेही वानखेडे यांनी सांगितले. त्यानंतर मलिक यांनी लगेचच माध्यमांकडे प्रतिक्रिया देत वानखेडे यांना आव्हान दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Hw Exclusive | जर हिंमत असेल,लढण्याची उमेद कायम ठेवली तर नक्कीच परिस्थिती बदलू शकते

Arati More

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर मनसेकडून हनुमान चालीसा आणि महाआरतीचे आयोजन, बाळा नांदगावकरांची माहिती

Aprna

“आव्हाडांकडे पाठपुरावा केला, पण मुख्यमंत्र्यांकडे जाईपर्यंत दखल घेतली नाही”, शिवसेना आमदाराची भूमिका

News Desk