HW News Marathi
महाराष्ट्र

‘मुंबईतल्या करी रोड दुर्घटतनेतल्या दोषींवर कारवाई होणार’ – किशोरी पेडणेकर

मुंबई। मुंबईतील करी रोड परिसरात आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. जीव वाचवताना एका रहिवाशाचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू यात झाला. त्यानंतर, इमारतीचे जे कोणी मॅनेजमेंट आहेत, ते आग प्रकरणी प्रथमदर्शनी दोषी दिसत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.

काळजी घेतली असती तर त्याचा आज जीव वाचला असता

राम तिवारी ज्यावेळी इमारतीला लटकत होते. त्यादरम्यान थोडी समयसूचकता दाखवली असती, पडू नये याची काळजी घेतली असती तर त्याचा आज जीव वाचला असता. मृत राम तिवारी या इमारतीतलाच कामगार होता, असं महापौर म्हणाल्या आहेत.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इमारतीवरुन खाली पडलेला हा इसम इमारतीचा सुरक्षारक्षक असल्याचं बोललं जात आहे. हा इसम आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गॅलरीत आला. मात्र आगाच्या ज्वाळा इतक्या होत्या की त्या इसमाने आपला बचाव करण्यासाठी गॅलरीला लटकला. यानंतर या इसमाने इमारतीवरुन उडी घेतली.

महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले

यावेळी मात्र रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी 30 वर्षीय अरुण तिवारी इमारतीच्या बाल्कनीत गेला. मात्र जीव वाचवण्यासाठी एका बाल्कनीतून दुसरीकडे जाण्याच्या नादात हात सुटून तो थेट खाली कोसळला. दुर्दैवाने जमिनीवर पडून त्याला प्राण गमवावे लागले. तर किशोरी पेडणेकर यांच्या सोबत मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आग आटोक्यात आली असून सध्या कूलिंगचे काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच या सगळ्या दुर्घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…म्हणूनच तुमची इतकी मस्ती आणि चरबी वाढली”, संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

Aprna

चंद्रकांत पाटील – ‘जन्माला यावे तर कर्नाटकात’

swarit

“आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?”, भाजपचा राज्य सरकारला सवाल

News Desk