HW News Marathi
महाराष्ट्र

‘जर महाराष्ट्र सरकारचे पाय खेचायचा प्रयत्न केला तर तुमचा पाय अडकेल’ -संजय राऊत

मुंबई। राज्य सरकारच्या वतीने काही राज्यपालांना दिलेल्या फाईलबाबत मंत्री बोलत आहेत. फाईल काय आहे कधी पाठवली याबाबत काही सांगू शकत नाही. लोकनियुक्त सरकार ज्या सरकारने घटनेनुसार शपथ घेतली आहे. ती शपथ राज्यपालांनी दिली आहे. त्या सरकारची राजकीय कारणामुळे अडवणूक करु नये असा इशारा शिवसेने नेते संजय राऊत यांनी दिला आहे. विधानपरिषद सदस्यांची नियुक्ती एमपीएससी नियुक्ती अशा प्रकारची अडवणूक हा राजकीय दबावाचा प्रकार असतो त्यांचे बोलवते धनी वेगळे असतात राज्यापालांनी असे करु नये. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये हा प्रकार घडत आहे. याबाबत राज्यातील मंत्री बोलतील असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

तर तुमचा पाय अडकेल असा इशारा

राजभवन हे सरकारला मदत करण्यासाठी असते सरकारचे पाय खेचण्यासाठी नसते, जर महाराष्ट्र सरकारचे पाय खेचायचा प्रयत्न केला तर तुमचा पाय अडकेल असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

राज्यपालांचे काम मर्यादित स्वरुपातलं

राज्यपाल प्रशासकीय गोष्टीमध्ये हस्तक्षेफ करत आहेत. त्यांना कोणी हस्तक्षेप करायला सांगत आहेत का हे पाहायला लागेल. जी काम राज्य सरकारची आहेत. त्या कामात घुसण्याचा प्रयत्न होत आहे. हे सर्वस्वी घटनाविरोधी आहे. राज्यपालाना कामाचा आढावा घेण्याचा अधिकार आहे. परंतू गावठिकाणी दौरे करण्याची गरज नाही. भाजप शासित राज्यातील राज्यपाल अशा प्रकारे दौरे करत नाहीत. हे समजून घेतले पाहिजे यानंतर समजेल की पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील राज्यपाल का असे वागत आहेत. राज्यपालांचे काम त्यांनी केले पाहिजे राज्यपालांचे काम मर्यादित स्वरुपातलं आहे. मंत्रिमंडळाचे निर्णय पाळावे आणि दुसरे काम यामध्ये घटनेतील शिष्टाचार पाळावे आणि घटनेनुसार नियम पाळले तर बरं पडेल” असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

१२ सदस्यांच्या यादीचं काय

एमपीएससीच्या सदस्यांची यादी उशीरा मिळाली असेल असे त्यांचे म्हणणे असेल तर १२ सदस्यांच्या यादीचं काय झाले या यादीला तर ९ महिने झाले आहेत. यावर उत्तर राज्यपालांनी दिलं पाहिजे असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

काँग्रेससोबतचा हातातला हात खांद्यावर

शिवसेना नेते संजय राऊत यांना राहुल गांधी यांच्या बाजूला बसल्यावरुन आणि खांद्यावर हात ठेवल्याच्या प्रकाराबद्दल प्रश्न केला असता संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, सध्या महाराष्ट्रात हातात हात घालून काम करत आहोत. तो हात खांद्यावर आला इतकच झाल आहे. आमचे चांगले संबंध आहेत. एकत्र राज्य चालवताना, सरकार चालवताना फक्त पक्ष जवळ येऊन चालत नाही मनंही जवळ यावे लागतात, त्याच दृष्टीने पावलं पडत असतील तर त्याचे लोकं स्वागतच करतील असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच बाजूच्या खुर्चीवर बसल्यावरुन संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, शिवसेनेला नेहमीच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये मानाचे स्थान दिलं जातं, राहुल गांधी यांच्याशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले मानाच्या गणपतींचे दर्शन

Aprna

सांगलीत भाजपला शिवसेनेचा धक्का!

News Desk

केंद्राकडून तपास यंत्रणांचा सतत गैरवापर होतोय खासदार शरद पवारांची नाराजी

News Desk