HW News Marathi
महाराष्ट्र

पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटी तातडीची मदत जाहीर!

मुंबई | राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पुरग्रस्थांना सरकारने मदत जाहीर केली होती. आज(३ ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अतीवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी मदत जाहीर

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्ज्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुरग्रस्थांना मदत जाहीर करण्याच्या चर्चा सरकार कडून येत होत्या पण आज(३ ऑगस्ट) त्यावर अंबलबजावणी झाली आहे. अतीवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

सानुग्रह अनुदान म्हणून प्रतिकुटुंब एनडीआरएफच्या निकषांच्या पुढे जाऊन १० हजार रुपये करण्यात आली आहे. दुकानदारांसाठी ५० हजार रुपये आणि टपरी धारकांसाठी १० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पूर्ण घर पडलं असल्यास १ लाख ५० हजार रुपये, ५० टक्के घर नुकसान झालं असल्यास ५० हजार रुपये आणि २५ टक्के नुकसान झालेल्या घरासाठी २५ टक्के तर अंशत: नुकसान झालेल्या घरासाठी किमान १५ हजार रुपयांची घोषणा जाहीर करण्यात आली आहे.

शेती नुकसानाचा प्राथमिक अंदाज आला आहे. प्राथमिक माहितीनुसार ४ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. मत्स्य व्यवसाय, एमएसईबी विभागाचं, ग्रामीण विकास या भागांसाठीही मदत केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी २५०० कोटी रुपये, नगर विकास विभागानं दिलेल्या नुकसानाचाही या एकूण पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, नुकसान भरपाईसोबतच मृतांच्या नातेवाईकांसाठी देखील आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये एसडीआरएफच्या निकषांनुसार ४ लाख रुपये, मुख्यमंत्री रिलीफ फंडमधून १ लाख रुपये, ज्यांच्या नावावर सातबारा आहे अशा शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा रकमेतून २ लाख रुपये, तर पंतप्रधानांनी जाहीर केलेले २ लाख रुपये अशी आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एका महिलेला बाजूला सारुन मतदारसंघ ताब्यात घेणं हा पुरुषार्थ आहे का?”, जयंत पाटील यांचा चंद्रकांत पाटलांना सवाल 

swarit

राज्यपालांच्या वाक्यावरुन वाद घालण्याची ही वेळ आहे का? आधी शेतकऱ्यांकडे लक्ष द्या –  देवेंद्र फडणवीस

News Desk

उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा बांलणीवर

News Desk