HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापुरी पायतानाच्या प्रसादानंतरही एखादी विकृत व्यक्ती…! मिटकरींची चंद्रकांत पाटलांवर बोचरी टीका

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच सांगलीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरीत टीका केली. त्यावर, याचा निषेध नोंदवत पुण्यातील राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांना चक्क नवरत्न तेलाची बॉटल भेट म्हणून पाठवली आहे. त्यावरून आता राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “नवरत्न तेलाने चंपी करण्याची हीच ती वेळ”, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

“कोल्हापुरी पायतानाचा प्रसाद मिळाल्यावरही एखादी विकृत व्यक्ती जर बडबडत असेल तर नक्कीच समजून जावं नवरत्न तेलाने चंपी करण्याची हीच ती वेळ”, अशा अत्यंत टोकाच्या शब्दांत अमोल मिटकरी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. याचसोबत #टोपीखालचे संस्कार हे देखील जोडण्यात आलं आहे. त्यामुळे, भाजप आणि राष्ट्रवादीत आता नव्या विषयामुळे वाकयुद्ध सुरु होण्याची शक्यता आहे.

“आपण कुणाबद्दल बोलतो? आपली तेवढी उंची आहे का? बोलताना जरा डोकं शांत ठेवून टीका करत जा. म्हणूनच तुमचं डोकं शांत करण्यासाठी हे नवरत्न तेल पाठवत आहे. यानेही तुमचं डोकं शांत झालं नाहीच तर, मी स्वखर्चाने तुमचा इलाज करतो”, असा इशारा राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्याने दिला आहे. संदीप काळे असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. “आपल्याला शरद पवारचं आव्हान नाही. कारण ५४ आमदारांच्या पुढे आम्ही त्याला जाऊ दिलं नाही”, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“राज्यात आपल्याला शरद पवारचं आव्हान नाही. कारण ५४ आमदारांच्या पुढे आम्ही त्याला जाऊच दिलं नाही. संपूर्ण आयुष्य गेलं तरी कधी तो ६० आमदारांच्या वर तो गेला नाही”, अशा एकेरीत भाषेत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यानंतर, राष्ट्रवादीतील रोष वाढलेला पाहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल

News Desk

उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात वाघाच्या बछड्याचा मृत्यू

News Desk

ठाकरे गटाला मोठा धक्का! शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Aprna