HW News Marathi
महाराष्ट्र

‘मुंबई विमानतळावरील फलकावर अदानी ग्रूपकडून स्पष्टीकरण’, म्हणाले…!

मुंबई। मुंबई विमानतळाच्या गेटवर आज शिवसैनिकांनी अदानी एअरपोर्ट नाव असलेला बोर्डची तोडफोड केली. मुंबई विमानतळावर अदानी ग्रूपच्या नावाच्या बोर्ड दिसल्याने आक्रमक शिवसैनिकांनी तोडफोड केली. या वादावर आता अदानी ग्रूपनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

अदानी कंपनीचं स्पष्टीकरण

“छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (CSMIA) येथे अदानी विमानतळांच्या ब्रँडिंगच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बाबतीत, आम्ही ठामपणे आश्वासन देतो की अदानी विमानतळ होल्डिंग लिमिटेड (AAHL) ने फक्त पुर्वीच्या कंपनीच्या ब्रांडिंगची जागा अदानी विमानतळ कंपनीच्या ब्रँडिंगने घेतली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व टर्मिनलच्या ब्रँडिंगमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (CSMIA) मधील ब्रँडिंग हे भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या निकष आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आले आहे. तसेच अदानी विमानतळ होल्डिंग लिमिटेड (AAHL) मोठ्या प्रमाणावर विमान वाहतूक समुदायाच्या हितासाठी सरकारने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत राहील”, असे एएएचएलच्या प्रवक्त्याने सांगितलं.

नेमकं काय घडलं?

व्हीआयपी गेट नंबर 8 आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील बोर्ड शिवसैनिकांनी लाठ्यांनी तोडला. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. मात्र तिथे अदानी विमानतळ असे लावलेले बोर्ड अजिबात सहन केले जाणार नाहीत, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. जीवीके प्रमाणे ‘मॅनेज्ड बाय अडानी एयरपोर्ट’ असा बोर्ड ठेवण्याची सूचना शिवसेनेने केली आहे. अन्यथा जिथे फलक दिसेल, तिथे तोडफोड करण्याचा सेना नेत्यांनी इशारा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ही तर शरद पवारांची कॉंग्रेसला धमकी…”,नारायण राणेंचं खोचक वक्तव्य

News Desk

मेळघाट हाटच्या माध्यमातून आदिवासी महिलांचे सक्षमीकरण!- यशोमती ठाकूर

Aprna

नारायण राणे यांचं जामिना नंतर पहिलं ट्विट! म्हणाले…..

News Desk