HW News Marathi
महाराष्ट्र

‘कास्टिंग काऊच करणाऱ्यांना अटकेची मागणी’, तर राज ठाकरेंनी केलं ‘त्या’ तरुणींचं कौतुक!

ठाणे। कास्टिंग काऊच करणाऱ्यांना तात्काळ अटक करा आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू देऊ नका, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे. तसेच कास्टिंग काऊच विरोधात आवाज उठविणाऱ्या तरुणींचं राज ठाकरे यांनी कौतुक आणि अभिनंदनही केलं आहे.

कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नयेत

राज ठाकरे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी कास्टिंग काऊच करणाऱ्या आरोपींना त्वरीत अटक करा. त्यांना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नयेत अशी कलमे लावा, अशी मागणी राज यांनी केली. तसेच ‘कास्टिंग काऊच’च्या जाळ्यात अडकलेल्या तरुणींनी धाडसाने पुढे येऊन आवाज उठविल्याबद्दल त्यांनी या तरुणींचे अभिनंदनही केलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

एका नवोदित अभिनेत्रीला डायरेक्टरने मुख्य भूमिका देण्याच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केली होती. या मुलींनी मनसेकडे या कास्टिंग डायरेक्टरची तक्रार केली होती. त्याची दखल घेत मनसे कार्यकर्त्यांनी सापळा रचून या डायरेक्टरला चोप दिला होता. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाईव्ह करत या प्रकरणाची माहिती दिली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सापळा रचत ठाण्याचा घोडबंदर रोडवरील फॉर्म हाऊसवर संबंधित निर्मात्यांना घेरलं. त्यानंतर त्यांना चांगलाच चोप देत तरुणीची सुटका केली होती.

अमेय खोपकर काय म्हणाले?

“मनसेचे उपाध्यक्ष पदमनाथ राणे यांना आज एक मुलीचा फोन आला. एका कास्टिंग डायरेक्टरने तिला लीड रोलसाठी गोरेगावमध्ये एका मॉलमध्ये भेटायला सांगितलं. तसेच लखनऊमधून निर्माते येणार आहेत त्यांना खुश करावा लागेल, असं सांगितलं. तिने सगळे पुरावे दिले. त्यानंतर आमच्या महिला रणरागिणींनी त्या कास्टिंग डायरेक्टरला मॉल ते ठाणे घोडबंदर रोडपर्यंत ट्रॅप केलं. ज्या गाडीत त्या मुलीला कास्टिंग डायरेक्टर घेऊन जात होता त्याला मनसे सैनिकांनी ट्रॅप केलं”, असं अमेय खोपकर यांनी सांगितलं.

‘हा महाराष्ट्र आहे, इथे राज ठाकरेचं चालतं’

“मुलींसोबत जर कुणी असं करत असेल तर त्यांचे हात-पाय तोडणार आणि तुमच्या प्रदेशात पाठवणार. ही मुंबई आहे, हा महाराष्ट्र आहे. इकडे राज ठाकरेंचं राज चालतं. सगळ्या भगिनींना आव्हान जर कुणी असा प्रयत्न केला तर आमच्याशी संपर्क करा, आम्ही तुमच्यासाठी उभे आहोत”, असंदेखील खोपकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पश्चिम बंगालमध्ये जी स्थिती होती, तशीच परिस्थिती ठाकरे सरकारला महाराष्ट्रात घडवायचीय” नितेश राणेंचा आरोप!

News Desk

Bhima Koregaon : विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लोटला जनसागर

News Desk

अनंत चतुर्दशीला गणेशाचे विसर्जन का?

News Desk