HW News Marathi
महाराष्ट्र

‘पूजा चव्हाण प्रकरणात नवी ऑडिओ क्लिप समोर’, संजय राठोड वादाच्या भोवऱ्यात!

पुणे। पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या हाती आता महत्वाचा पुरावा लागला आहे. 22 वर्षीय पूजाच्या मोबाईलमधून पुणे पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे मिळाले असल्याची माहिती आता समोर आली आहे. या पुराव्यात कॉल रेकॉर्डिंग आढळून आल्याचं समजतंय. यात पूजा आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचं संभाषण आहे.

पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांची पुन्हा नवी ऑडिओ क्लिप

आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. हे कॉल पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या पाच-सहा दिवसांपूर्वीचे असल्याचा पुरावा पोलिसांना मिळाला आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. धक्कादायक म्हणजे त्यातील एक संभाषण जवळपास 90 मिनिटाचं असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.

संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला

7 फेब्रुवारी 2021 ला पूजा चव्हाणनं पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणानंतर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 28 फेब्रुवारीला संजय राठोड यांनी राजीनामा दिला. पूजा चव्हाण आत्महत्येचा पुणे पोलीस तपास करत आहेत.

फोनवरील संपूर्ण संभाषण बंजारा भाषेत

आता पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागलेत. या पुराव्यात फोन रेकॉर्डिंग असून फोनवर बोलणारा व्यक्ती संजय राठोड असल्याचं सांगितलं जात आहे. फोनवरील संपूर्ण संभाषण बंजारा भाषेत आहे. सध्या पोलीस हे संभाषण ट्रान्सलेट करुन घेताहेत. मात्र आता पुढे काय होतं हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उदय सामंत यांचं वक्तव्य

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान शिवसेना आमदार संजय राठोड हे पुन्हा मंत्रिमंडळात सामील होण्याचे संकेत मिळताहेत. कालच शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यांचे संकेत दिलेत. उदय सामंत म्हणाले की, संजय राठोड यांच्या कामाची पद्धत पाहता त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, लवकरच ते मंत्रिमंडळात सामील होतील. उदय सामंताच्या वक्तव्यावर स्वतः संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राठोड यांचा संभाजीनगर दौरा

माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं. सध्या संजय राठोड हे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला होता. मी सध्या संभाजीनगरचा दौरा करत आहे. माझ्या समाजातील आणि भटक्या समाजातील बांधवाना भेटत आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रश्न आहे. माझ्या मंत्रीपदाबद्दल मला काही बोलायचं नाही. मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही, याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असं राठोड यांनी स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नव्हतेच !

News Desk

मुंबईला पाणी पुरवणारं मोडक सागर तलाव भरलं!

News Desk

महाविकासआघाडी सरकारकडून मंत्र्यांची प्रकरणं दाबली जातात, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

News Desk