माळीण। माळीण दुर्घटनेला आज ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नातून साकारलं गेलेलं आणि अल्पावधीत उभं राहिलेलं राज्यातलं पहिलं पुनर्वसन झालेलं स्मार्ट ग्राम म्हणून माळीणची नवी ओळख पुढे आली आहे आणि आता पुन्हा माळीण गावची चर्चा सुरू झाली आहे. माळीणची आठवण करून देणारा प्रकार म्हणजे महाडच्या तळीये गावात घडलेली घटना.
नेमकं काय घडलं?
माळीण हे गाव एका रात्रीत डोंगराखाली अडकलं होतं. त्यामुळे अवघ्या माळीण गावावर शोककळा पसरली होती. पण त्यानंतर मदतीचे ओघ सुरु झाले. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन माळीणला तात्पुरतं सावरलं. सुरवातीला जागा उपलब्ध न झाल्याने पाहिलं वर्ष वाया गेलं. पण जागा उपलब्ध झाल्यावर पुढील 3 वर्षात हे गाव वेगाने उभारलं गेलं आहे. अख्खा गाव नाहीस झालं तरी ना प्रशासन ना मीडियाला हि गोष्ट कळली होती. या घटनेची माहिती तालुका प्रशासनापर्यंत पोहचवण्यासाठी येथून जाणाऱ्या एसटी बसची मदत घ्यावी लागली होती. आजही ती वेदनादायक घटना येथील गावकरी विसरलेले नाहीत. महाड मधील तळीये गावात घडलेल्या घटनेमुळे माळीणमधील नागरिकांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
माळीण गाव नव्याने उभारलं
माळीण गावाच्या दुर्घटनेला आज(३० जुलै) ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. या गावात अनेक संस्थांनी आणि सरकारने मदत करून पुन्हा उभारलं आहे . घर आणि रस्त्यांव्यतिरिक्त एक तलाठी कार्यालय शाळा, ग्रामपंचायत, समाज मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, संरक्षक भिंत, सामूहिक जनावरांचा गोठा, अशा सुमारे 18 पायाभूत सुविधांनी सुसज्य आणि देखणे माळीण उभारले गेले आहे. मात्र या परिसरातील अजूनही अनेक गावे भीतीच्या छायेत आहेत. त्यामुळे या गावांमध्ये कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी योग्य ते पुनर्वसन व्हावं अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.