नवी दिल्ली | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाशी केलेल्या चर्चेनंतर ममता बॅनर्जी या संयुक्त पुरोगामी आघाडीतील दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत. विरोधी पक्षांच्या संभाव्य एकजुटीच्या चाचपणीसाठी ममता राजधानीत आल्याचे मानले जात आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सोनिया गांधीना भेटत आहेत हे चांगलं लक्षण
शिवसेनेचे संजय राऊत हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. “ममता बॅनर्जी या शरद पवारांची भेट घेणार आहेत. भेटीगाठी व्हायला हव्यात कारण यातून विरोधी पक्षाच्या ऐक्यावर एकमत होऊ शकेल का यावर चर्चा करणं गरजेचं आहे. ममता बॅनर्जी सोनिया गांधीना भेटत आहेत हे चांगलं लक्षण आहे. विरोधी पक्षाची एकजूट ही काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकांन एकमेकांना भेटलं पाहिजे. एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे,” असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
बॅनर्जी आणि मोदींची भेट
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान निवासमध्ये ममता बॅनर्जी यांनी मोदींसोबत चर्चा केली आहे. ममता बॅनर्जी पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून सोमावारी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. मंगळवार सकाळपासूनच ममता बॅनर्जी यांच्या राजकीय मंडळींसोबत भेटीगाठींचं सत्र सुरु आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर, काँग्रेस नेते कमलनाथ यांची भेट आणि चर्चा झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. ममता बॅनर्जी या दौऱ्यादरम्यान अनेक नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.