HW News Marathi
देश / विदेश

गोकुळ दूध महागलं, विक्री दरात २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय

कोल्हापूर | कोल्हापूर, दूध संघातून एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.म्हैशीच्या दुधाला २ रुपये तर गायीच्या दुधाला १ रुपयांची वाढ करत असल्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दूध खरेदी दरवाढ ११ जुलै पासून लागू होणार असल्याचं सांगितलं. दूध खरेदी दर वाढीमूळे दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील भागात दूध विक्री दरातही वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

इतर जिल्ह्यात गोकुळ दुधात २ रुपयांनी वाढ

गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना सध्या म्हशीच्या दुधाला ३९ रुपये तर गाईच्या दुधासाठी २६ रुपये दर देत आहे. नवीन दरवाढी प्रमाणे कोल्हापूर जिल्हा वगळता इतर ठिकाणी दूध विक्री दरात ही दोन रुपायांची वाढ होणार असल्याची घोषणा हसन मुश्रीफ यांनी केली आहे. जिल्हा बँकेकडून भूमिहीन शेतकऱ्यांना २ म्हैशी पर्यंत विनातारण कर्ज देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गोकुळचा वीस लाख लिटर संकलनाचा प्रयत्न आहे आणि आम्ही तो टप्पा लवकरच गाठणार आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

मुंबईतही गोकुळ दूध महागणार

मुंबईचा नागरिक हा आधीच दरवाढीमुळे त्रासलेला आहे. त्यात आता गोलूला दूध सुद्धा महागलं आहे. गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांना ११ जुलैपासून म्हैशीच्या दूध खरेदी दरात दोन रुपये आणि गायीच्या दुधाच्या दरात १ रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, कोल्हापूर वगळता राज्यातील इतर भागात दूध विक्री दरातही २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात जिथं जिथं गोकुळच्या दुधाची विक्री केली जाते, तिथल्या ग्राहकांना दूध खरेदीसाठी अधिकचै पैसे मोजावे लागणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना मातृशोक; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Aprna

विमान अपहरणाच्या धमकीमुळे देशभरातील विमानतळांना हाय अलर्ट

News Desk

काही काळासाठी नितीशकुमार यांची वरात काढून त्यात ‘घोडे’ नाचवले जातील- सामना 

News Desk