HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रीय नेतृत्व करण्याचा दिवस लवकरच उगवेल, राऊतांच्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवशी शुभेच्छा!

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांचा आज (२७ जुलै) वाढदिवस. राजकीय वर्तृळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. मात्र, गेली अनेक वर्ष शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसोबत असलेलं नातं अतुट आहे. आजच्या या दिवशी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये असं लिहिलं आहे की, अखंड साथ.अतूट नाते. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे..तो दिवस लवकरच उगवेल.. आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

राष्ट्राला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची गरज

पत्रकारांशी बोलतानाही राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो, असं प्रत्येकाला वाटतं. हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो, असं ते म्हणाले आहेत..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Prithviraj Chavan Exclusive : फडणवीस सरकारच्या काळात एकही मोठा पायाभूत प्रकल्प पूर्ण झाला नाही !

News Desk

केंद्र सरकार महाराष्ट्राला दाबाण्याचा प्रयत्न करत आहे, रेल्वे सुरु करण्यावरुन आघाडी सरकारकडून प्रतिक्रिया!

News Desk

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंंत सांकेलीम मतदारसंघातून 300 मतांनी आघाडीवर

Aprna