मुंबई | राज्यात कोरोना विषाणू अजूनही थैमान घालत आहे. कोरोनाला हरवायचं असेल तर लसीकरण हा एकच उपाय आहे. देशात आणि राज्यात लसीकरणाला जानेवारी पासून सुरुवात झाली होती. महाराष्ट्र आता लसीकरणाच्या बाबतीत आघाडीवर आहे. राज्यात करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या आता एक कोटींहूनही अधिक झाली आहे. अशा प्रकारचा विक्रम करणारं महाराष्ट्र हे पहिलं आणि एकमेव राज्य ठरलं आहे.
मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
महाराष्ट्र लसीकरणाच्या बाबतीत आघाडीवर आहे याचं कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत नागरिकांचं आणि प्रशासनाचं कौतुक केलं आहे. करोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला आहे.
Despite the tremendous natural calamities, today Maharashtra set a benchmark of being India’s first and only (as yet, and we hope for many more states soon) to have fully vaccinate 1 crore people.
Congratulations to our doctors, nurses, medics and other officials for this!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 26, 2021
एकूण रुग्ण किती?
गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जेमतेम ४०० ने घट झाली. कालच्या दिवसात ३९ हजार ३६१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यासोबतच ऍक्टिव्ह केसेसमध्येही तीन हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात ४१६ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. महाराष्ट्रामध्ये एकूण ५ हजार २१२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये शनिवारच्या तुलनेत घट झालेली पाहायला मिळत आहे. शनिवारी राज्यात ६ हजार ७५३.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.