HW News Marathi
Covid-19

राज्याच्या चिंतेत वाढ! आज कोरोना रुग्णांची संख्या 4 हजारपेक्षा जास्त

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात आज (19 जून) 4004 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबईत आहेत. यामुळे आता मुंबईकरांच्या चिंता वाढली आहे. कोरोनामुळे राज्यात आज एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोरोनामुळे  राज्यातील मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका आहे. तर राज्यात कोरोनामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात 97.84 टक्के इतके झाले आहे. राज्यात आतापर्यंत 23 हजार 746 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. तर राज्यात 77 लाख 64 हजार 117 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

देशात देखील कोरोना रुग्णाच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. देशात आज 12 हजार 899 कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 15 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. देशात सध्या 72 हजार 474 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर देशात आतापर्यंत 8 हजार 518 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

 

 

 

Related posts

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर ! आज नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्या पार

News Desk

दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना-युवकांना परतण्यासाठी प्रवासव्यवस्था करा !

News Desk

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण

News Desk