HW News Marathi
महाराष्ट्र

खेडमध्ये घरांवर डोंगर कोसळला, 17 जण ढिगाऱ्याखाली

खेड | मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील खेड आणि चिपळूणमध्ये महापूर आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात आता मुसळधार पावसात घरांवर डोंगर कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खेडमधील पोसरे बौद्धवाडीत मीठ डोंगर घरांवर कोसळला. या दुर्घटनेमुळे जवळपास 17 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. डोंगर कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 25 जनावरांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

रायगडमध्ये दरड कोसळून चौघांचा मृत्यू

तर तिकडे रायगड जिल्ह्यात दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील साखर सुतार वाडी येथे दरड कोसळून आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजून 5 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तर 4 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या गावांना जोडणारे पितळवाडी- उमरठ फाटा पूल तसेच उमरठ फाटा ते साखर पूल देखील वाहून गेल्यामुळे मदत यंत्रणा पोहोचू शकत नाही.

पाटणमध्ये दरड कोसळली, आंबेकरमधील घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली, कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता

पाटण तालुक्यातील मोरणा विभागात असणाऱ्या आंबेघर येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सद्यस्थितीत समोर येत आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आहे. मुसळधार पावसामुळे मदत कार्यामध्ये अडचणी येत आहेत या भागातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे तर किल्ले मोरगिरी येथेही दरड कोसळल्याने महादेवाचे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहे. येथील परिसरातील ग्रामस्थांना प्रशासनाने इतरत्र हलवले आहे ही घटना ही गुरुवारी सायंकाळी घडली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने केला १४०० एकर जमिनीचा व्यवहार ,घोटाळ्यातील नावे जाहीर करणार, निलेश राणेंचा इशारा

News Desk

‘सरकारकडून वारकऱ्यांची मुस्कटदाबी होतेय’, दरेकरांचा आरोप

News Desk

दर्जेदार रस्ते व पुलांमुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार! – नितीन गडकरी

Aprna