HW News Marathi
महाराष्ट्र

पावसाचा धुमाकूळ! १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मुख्य मंदिराला पाण्याचा वेढा

पुणे | महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, कोल्हापूरात पूर आला आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांत ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर मुख्य मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे.

भीमाशंकर मंदिराला पाण्याने घेरलं

गेल्या 24 तासांपासून पुणे, जुन्नर, खेड या भागांत दमदार पाऊस कोसळतोय. त्यातही भीमाशंकर परिसरात गेल्या अनेक तासांपासून दमदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली. काल आणि आज भीमाशंकर परिसरात जोपदाप पाऊस पडल्याने मंदिराच्या बाजुच्या डोंगरातुन पुराचा लोट मंदिरात आला आहे. त्यामुळे मुख्य मंदिरात पाणी साचलेलं पाहायला मिळतं आहे.

मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी

मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरु असल्याने पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक वळुन तेच पाणी मंदिरात आल्याचं पाहायला मिळतंय. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांना प्रवेश नाही आहे. मंदिरात केवळ पुजारी असतात. मंदिरात दैनंदिन पुजा-अर्चा सुरु असते. मात्र आता पाण्याच्या वेढा वाढल्याने प्रशासनाने पुजारी आणि मंदिरातील कर्मचाऱ्यांनाही योग्य ते सूचना दिलेल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Cyclone Tauktae : महाराष्ट्रासह देशातील ‘या’ राज्यांतही चक्रीवादळामुळं सतर्कतेचा इशारा

News Desk

मराठा आरक्षण | संभाजीराजे आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार

News Desk

कोल्हापूर | ‘गोकुळ’च्या राखीव गटात विरोधकांची आघाडी

News Desk