HW News Marathi
महाराष्ट्र

“बॅनरवर ‘विकासपुरुष’ लिहिल्याने…”, रोहित पवारांचा भाजपला टोला!

पुणे | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज(२२ जुलै) वाढदिवस आहे. कार्यकर्त्यांना बॅनर लावू नका असं सांगून देखील त्यांचं चाहत्यांनी बॅनर लावले आहेत. विरोधी पक्षांमध्ये नेहमीच कुरघोडी सुरु असते, मग वाढदिवसरूनच का होई ना. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यात लावलेल्या बॅनर वरून त्यांच्यावर टीका केली आहे.विकासपुरूष असं संबोधण्यात आलं आहे,परंतु ज्यांनी पुण्यासाठी काहीच केले नाही त्यांचे बॅनर भाजपा झळकवतंय असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

पुण्यात सध्या बॅनर बाजी सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसासाठी त्यांच्या चाहत्यांनी बॅनर लावले आहेत. ज्या व्यक्तीनं पुण्यासाठी काही केलंच नाही अशा व्यक्तीचे बॅनर भाजपानं पुण्याचे शिल्पकार म्हणून झळकावले आहेत. पण पुण्यातील ज्या प्रमुख इमारती आहेत. जिल्हा प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, ससून या महत्त्वाच्या इमारतींचा यात समावेश आहे. त्या इमारतींचं काम सुरू असताना अजितदादा तेथे सकाळी ६ वाजता भेट द्यायचे, त्याठिकाणी पाणी निट मारलंय का? व्यवस्थित काम होतंय का? याचा आढावा घ्यायचे. सकाळी जिल्हाधिकारी इतर अधिकारी उपस्थित व्हायचे. उपमुख्यमंत्री, मंत्री असतानाही एवढ्या बारकाईनं त्यांनी पुण्यात काम केले आहे. फंड आणला म्हणून काम संपलं असं होत नाही तर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन ते माहिती घ्यायचे असं त्यांनी सांगितले आहे.

पुण्यात बॅनर वॉर

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. त्यांच्या चाहत्यांचा मात्र पुण्यात बॅनर वॉर दिसून येतो आहे. पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी करत एकमेकांना आव्हान दिले. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या उंबरठ्यावर पुण्यात फडणवीस आणि पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीकडून जोरदार ‘पोस्टरबाजी’ करण्यात आली आहे.

कारभारी लयभारी

राजकारणात मतभेद फक्त राजकारण्यांपुरती मर्यादित नसतात तर ते त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही चढाओढ चालू असते. पुणे शहर भाजपाकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा ‘विकासपुरुष’ ‘पुण्याचे नवे शिल्पकार’ असा उल्लेख असलेले फ्लेक्स अनेक ठिकाणी लावले आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. अजित पवारांचे ‘कारभारी लयभारी’ असा उल्लेख फ्लेक्स सगळीकडे लावण्यात आले आहे. या निमित्ताने या शहरात झळकत असलेल्या फ्लेक्सचा चर्चेचा विषय ठरत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतर प्रमुख राजकीय पक्षांमधील ‘पोस्टर युद्ध’ आणखी वाढत जाणार असल्याची शक्यता आहे. पुणेरी पाट्यांप्रमाणे पुण्यातील राजकीय बॅनरवरील स्लॉगन्स सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही देवेंद्र फडणवीसांच अजब विधान!

News Desk

पुन्हा मातोश्रीची चिंता वाढली ! तेजस ठाकरेंच्या २ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण 

News Desk

एकनाथ खडसेंवर अटकेची टांगती तलवार – अ‍ॅड. असीम सरोदे

News Desk