HW News Marathi
Covid-19

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन

केरळ | देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. परंतु देशाच्या अनेक भागांमध्ये आता दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. परंतु सध्या केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. परंतु केरळमध्ये २४ आणि २५ जुलै रोजीच लॉकडाऊन लागू राहणार आहे. दरम्यान २४ आणि २५ जुलै रोजी १२ आणि १३ जून रोजी जारी करण्यात आलेलेच निर्देश लागू राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

केरळमध्ये गेल्या २४ तासांत गेल्या २५ दिवसांमधील सर्वाधिक १६,८४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी ५ जून रोजी राज्यात १७,३२८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. दरम्यान, संपूर्ण देशात नव्या रुग्णांच्या झालेल्या नोंदीपैकी ४० टक्क्यापेक्षा अधिक रुग्ण हे केरळमध्येच सापडले आहेत. पूर्वेकडे मिझोरममध्ये आतापर्यंत ८०६ आणि मणिपूरमध्ये ११२७ रुग्णांची नोंद झाली आहे.

आसामच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ५ जिल्ह्यांमध्ये संसर्गाचा दर अधिक असल्यानं लॉकडाऊन कायम राहणार आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशात लागू करण्यात आलेला नाईट कर्फ्यू एकाआठवड्यासाठी वाढवण्यात आला आहे. हरयाणात निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली असली तरी काही नियम लागू करण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १३,४४८ उद्योगांना परवाने

News Desk

जायचंय पंढरपूरला पण गाडी निघाली गोव्याला ! भाजपने महाविकासआघाडीला डिवचले

News Desk

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण

News Desk