HW News Marathi
Covid-19

‘बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही’, शेलारांचा राऊतांवर हल्लाबोल

पुणे | महानगरपालिका निवडणुका लवकरच होणार आहेत. महापालिकेवर सत्ता गाजवली आहे शिवसेनेनी. सतत त्यांचाच उमेदवार निवडून येत असल्याने, याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक विधान केलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेचा महापौर होईल असा विश्वास व्यक्त करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला. बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी गाय, बैल होत नाही, असं आशिष शेलार म्हणाले. सध्याची अवस्था राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोरात, असं टीकास्त्र शेलारांनी ठाकरे सरकारवर सोडलं आहे.

पोलिसांकडून राज्यात वसुलीचं काम सुरू

महाविकासआघाडी आणि विरोधी पक्षांमध्ये नेहमीच कुरघोड्या होत असतात. आशिष शेलार यांनी आता संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. पोलिसांकडून राज्यात वसुलीचं काम सुरू आहे. महाविकास आघाडीमधील नेते सकाळी उठले की स्वबळ असे करतात, कोण दिल्लीला जातं, तर कोण बैठक घेत आहेत. महाविकास आघाडीमधील नेते सकाळी उठले की 108 वेळा स्वबळाचा मंत्र जपत आहेत, असा टोला शेलारांनी लगावला. भूखंडाचे श्रीखंड पार्ट 2 हा धंदा महाविकास आघाडीने सुरू केला आहे. जनतेतून निवडून आलेल्या सदस्याचे अधिकार काढून घ्यायचे, असं म्हणत त्यांनी 12 आमदारांच्या निलंबनवार भाष्य केलं आहे.

फोन टॅपिंगचे पुरावे असतील तर द्या

पेगाससच्या मुद्यावरून सध्या राजकारणी एकमेकांवर आरोप करत आहेत. फोन टॅपिंगचा कारभार हा केंद्र सरकारचा नाही. असेल तर पुरावा द्यावा, नाही तर गप्प बसावं, अशी ताकीद आशिष शेलार यांनी विरोधकांना दिली आहे. संसदेच्या अधिवेशनात सुद्धा संजय राऊत यांनी हा मुद्दा मांडलं आहे.

मुंबईच्या रुग्णालयांवर कारवाई

‘ऑक्सिजन अभावी लोकांचे जीव गेले नाहीत’ असं विधान केंद्रीय सरकारने केलं आहे. यावरून राऊतांनी ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाले असल्यास केंद्रावर गुन्हा दाखल करावा असं सांगितलं आहे. यावरून आशिष शेलारांनी मुंबईतील रुग्णालयांवर गुन्हा दाखल करावा लागेल राऊत साहेब, मुंबईत अनेक ठिकणी घटना घडल्या आहेत, त्यामुळे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल, असं प्रत्युत्तर केलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वार्थी राजकारणासाठी जोमात, सामाजिक प्रश्नावर कोमात ! ‘लोकल’च्या वादात रोहित पवारांची उडी 

News Desk

‘या’ राज्यातून १२०० जणांना झारखंडला नेण्यासाठी पहिली नॉनस्टॉप विशेष ट्रेन रवाना

News Desk

Unlock 3.0 | ३१ जुलैनंतर देशात ‘अनलॉक-३’ची प्रक्रिया सुरु होणार ?

News Desk